Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Wednesday, March 28, 2012

बर झाल नाकारलस


बर झाल नाकारलस


नाहीतरी कुठे मी इतका चांगला आहे ?

बर झाल नाकारलस

कारण मनातल्या प्रेमाचा रंगही आता भंगला आहे




बर झाल नाकारलस

नाहीतरी वेळ कुठे आहे तुला माझ्यासाठी

आणि मी भेटायच ठरवल

तरी भेट काय घ्यावी तुझ्यासाठी



बर झाल नाकारलस

नाहीतरी तूझे शौक परवडनारे नव्हते

देण्यासाठी प्रेमच उरले

तेवढेच तुला दिसत नव्हते



बर झाल नाकारलस

नाहीतरी माझ्या भावना तुला समजतच नव्हत्या

ओल्या ठेवल्या भरपूर रे

पण तया हृदयातल्या ह्रुदयातच सुकत होत्या



बर झाल नाकारलस

कारण विरहाची मला सवय आहे

परत परत प्रेमात पडायच

हेच तर खर वय आहे



बर झाल नाकारलस

नाहीतरी तुझ्या आठवणीचा नुसता खच पडला आहे

तू दिलेल्या चोकलेटचा कागद

अजुनही पाकिटात तसाच दडला आहे



बर झाल नाकारलस कारण

त्या चोकलेटची चव जिभेवरून उडली आहे

बर झाल नाकारलस

त्यातली थोडीशी गोडी ह्रुदयात माझ्या उरली आहे



बर झाल नाकारलस

कारण दुराव्यताही मजा आहे

तुझ्या विरहात कविता लिहिण्याची

हीच तर खरी नशा आहे
-- 

देशात काय चाललय


परवाच एका स्फोटात मेलो.पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो.स्वर्गात जाताच टिळक भेटले.नमस्कार म्हणताच प्रसन्न हसले.टिळकांनी विचारले, स्वातंत्र्यानंतर बदललय का काहि ?म्हटल छे हो, सरकारच डोक ठिकाणावर नाहि.आजही स्वातंत्र्यासाठी आम्ही रक्तच देतो.पण आझाद मात्र काश्मीर होतो.दुरवर सावरकर दिसले म्हणुन धावलो.म्हटल तात्या आज जन्माच पुण्य पावलो.ते म्हणाले, सध्या तरी सगळ निवांत आहे.स्वर्गात काँग्रेसवाला नाहि तर सगळ शांत आहे.त्यांनाच विचारले तात्या इथे शिवराय कुठे राहतात.म्हणाले ते, पहा सौधातुन आपल्याकडेच पाहतात.छत्रपतीँचा विजय असो म्हणुन चटकन हात जोडले.पण घडले भलतेच, ते मझ्यावरच ओरडले.काय रे ? कोण्या जेम्स लेनने म्हणे बत्तमीजी केली.तुमची अक्कल तेव्हा सांगा कोठे चरायला गेली ?मान वर करायची माझी हिम्मत होत नव्हती,आणि महाराजाची नजर माझ्यावरुन ढळत नव्हती.मी म्हणालो, कबुल आहे महाराज तुमची स्वप्न आम्हाला कळलीच नाही.पैसा सोडुन आमची नजर दुसरीकडे वळलीच नाही.पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे नेमके आवाज हेरतात,ब्र म्हणायचा अवकाश लगेच गाढवाचे नांगर फिरवतात.खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो,कोणीही आपल्या गाडीखाली गरिबांना चिरडतो.हे सगळे ऐकुन महाराजांच्या गालाचे कल्ले थरारले,आमच केविलवाण जग पाहून डोळ्यात पाणी तरारले.क्षणभर राजेपण विसरुन ते दुःखाने थरथरले,आणि मग आमच हे अस वगण बघुन रागाने बिथरले.पाय लटपटले मला वाटले आता कंबख्ति भरली म्हणुन समज,चुकिची शिक्षा गर्दन मारलीच म्हणुन समज.पण मेलेल्यांना मारायला ते खुर्चीतले नेते नव्हते,न्याय कठोर असले तरि ह्रदय त्यांचे रीते नव्हते.मान खाली घालुन तसाच पुढे गेलो.अहम आश्चर्यम स्वर्गात मला औरंगजेब भेटला,म्हणे काफरांना मारुनच तर स्वर्ग गाठला.जिन्हा सुद्धा तिथेच होता.म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखांवर जाईल,आणि मग स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल.त्याला म्हणालो जरी स्वर्गाची फाळनी होनार आसेलतरी 55कोटी द्यायला गांधी स्वर्गात नसेलतुम्ही आजून किती मागनार दूस~यांकडून आडोसेईथे पून्हा जन्म घेतील हजारो नथुराम गोडसेत्याला मूतोड जवाब देवून तसाच पुढे निघालोस्वर्गात मला महात्मा फुले भेटलेत्यांना पाहून डोळ्यात माझ्या आश्रूंचा सागर दाटलाकस सांगु तूम्हाला खाली आता शिक्षनाचा काळा बाजार थाटलाहे सर्वजन रात्री मला एकत्र भेटले .आजच्या माणसाची व्यथा ऐकुन रागाने पेटलेते म्हणाले,आम्ही केलेल्या कार्याला काहीच नाही का अर्थ ?आमचे प्रयत्न, आमचे बलीदान सगळेच कसे गेले व्यर्थ ?शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातच भ्रष्टाचार कसा काय आलामाणसाच्या स्वार्थी वृत्तीमूळे सामान्य माणूस पूरता बेजार झालामंदिर, मुर्ती, पुतळे बांधुन देवधर्म तुम्ही करतापण माणसातील खऱ्याखूऱ्या देवालाच तुम्ही  पुन्हा पुन्हा मारतासर्व जीवांमध्ये मानवाला सर्वात श्रेष्ठ बनवलपण या माणसानेच आज माणसातील माणुसपण नष्ट केलबोलताना वाईट वाटते पण आता वेळ आली आहे विचार करण्याचीखरच चुकी केली का माणूस हा प्राणी बनवण्याचीबोलून बोलून थकले आणि झाले सगळे शांतअसे वाटले मरण त्र आलेच होते पं हा आहे कायमचा एकांत अजूनही वेळ गेली नाही सुधारा आपले आयुष्यनाहीतर मनुष्याच्या विनाशाला कारणीभूत ठरेल फक्त आणि फक्त मनुष्य ..........!!


Wednesday, March 21, 2012

एक अश्रू..

एक अश्रू..
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा.. तो अश्रू.... हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही..........


एक पाऊल..
तुझ्यासाठीच अडखळणारं,
तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..
तुझी पाऊलखूण शोधणारं..


एक नजर..
जी सारखी तुलाच शोधते...
प्रत्येकाच्या डोळ्यात..
तुझीच छबी शोधते..
मागे वळून .. पुन्हा पुन्हा.. तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..


एक मिठी..
तुझ्याचसाठी रिकामी..
तुझ्याशिवाय मोकळी..


एक कुंचला..
तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला..
तू येऊन पुन्हा..
रंग भरशील माझ्या आयुष्यात..
अशी आस लावणारा..


एक जीव..
तडफडणारा.. असहाय्य..
तुझ्याविना.. तुझ्याचसाठी...

Monday, March 12, 2012

मला आवडणाऱ्या काही साध्या-सोप्या गोष्टी लिहीतो

रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत. मग निराशा येते, राग येतो आणि आपली खूप चिडचिड होते. आपण रागावलो की तो राग मित्रांवर किंवा घरच्यांवर काढला जातो. मग राग गेला की आपल्याला वाईट वाटतं, आपण त्यांची क्षमा मागतो आणि ते आपल्याला माफही करतात. पण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. आपण ज्या कारणामुळे चिडलो होतो ती गोष्ट शुल्लक वाटू लागते.
असं झालं की मला एक गोष्ट आठवते. एक माणूस देवाचे आभार मानत असतो. तो म्हणत असतो की "माझ्याकडे नवे बूट नव्हते म्हणून मी दु:खी होतो त्या वेळी तू मला एक माणूस दाखवलास ज्याच्याकडे पाय पण नव्हते. मग माझी तकरार आपोआप मुकी झाली." थोडक्यात सांगायचं तर आपण छोट्या दु:खांकडे लक्ष देऊन त्यांना मोठं करतो पण छोट्या सुखांकडे लक्षच देत नाही. जसं बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होत नाहीत, तसं त्याहून कितीतरी जास्त गोष्टी आपल्याला खुश करायचा प्रयत्न करत असतात. पण आपल्या एक लहानशा दु:खाच्या नादात आपण त्या दहा खुश करणाऱ्या गोष्टींना विसरतो.

जर आतापर्यंतचे विचार पटले असतील, तर मनात एक प्रश्न पण आला असेल. आपण या लहान सुखांकडे लक्ष कसं द्यावं? काही मनासारखं नाही झालं तर त्याला पटकन मनातून बाहेर काढून जे आपल्याला सुख देतं ते कसं करावं? याचं उत्तर माझ्या एका मैत्रिणींकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. त्या म्हणाल्या की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काही नाही' आसं म्हटलं की त्या 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायच्या. मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. त्या पण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायच्या.

पण काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठतास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला अशी आमची उत्तरं येऊलागली. मग त्यांच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊलागतात.

तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. जसं आपण बंद असलेल्या मंदिरासमोरून जाताना पण 'आत देव आहे' या विश्वासाने नमस्कार करतो, तसं या प्रयोगावर पण विश्वास करून बघा. अट फक्त एकच, की तुम्ही 'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे. हा प्रश्न स्वत:ला तर विचाराच, पण आपल्या मित्रांना किंवा घरातल्या व्यक्तिंना विचारा. उत्तर कितीही शुल्लक वाटलं तरी नीट ऐका, तुमचं उत्तर पण सांगा. बघा तुम्हाला पण मस्त वाटेल आणि तुमच्या मित्रांना पण. हा प्रश्न खूप बाळबोध वाटतो, किंवा मित्र चेष्टा करतील असं वाटत असेल तर आधी काही दिवस स्वत:लाच विचारा. मग एकदा तुम्ही रोजच्या दिवसाचा आस्वाद घेऊलागलात की मित्रांना विचारा 'आजची चांगली गोष्ट काय?'

आता शेवटी मी मला आवडणाऱ्या काही साध्या-सोप्या गोष्टी लिहीतो. खाण्यावरून सुरूवात केली तर तेलकट तरी आणि तिखट मिसळ, आईस-क्रिम, उन्हात फिरून आल्यावर उसाचा रस, पुण्यातली सुजाताची मस्तानी, पाऊस पडत असताना गरम गरम भजी, रात्री झोपायच्या आधी एक छोटं चॉकलेट, आईच्या हातचं जेवण, हापूस आंबा असे असंख्य पदार्थ आहेत. हे रोज एक एक करून खायचं असं ठरवलं तरी वर्षाच्या 'चांगल्या गोष्टींची' यादी होईल. रेडिओ वर अचानक लागलेलं आपल्याला आवडणारं गाणं, हे पण एक वेगळंच सुख आहे. त्यात ते गाणं थोडं जुनं असेल आणि आपल्याला त्याचा विसर पडत असताना ते लागलं तर मग अजूनच मस्त वाटतं. पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा सुगंध पण हृदयात सुकलेल्या भरपूर आठवणी परत ओल्या करून जातो. आपण नवी साडी किंवा नवा शर्ट घातला की होणारी प्रशंसा हे पण एक छोटंसं सुखच आहे. अंघोळ करून स्वच्छ झाल्यावर अंगावर मारलेलं अत्तर, आपल्याला दिवसभर त्याच्या सुगंधाने ताजंतवानं ठेऊशकतं. अशा कितीतरी लहान वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला खूप आनंद देऊशकतात, जर आपण त्यांना आनंद द्यायची संधी दिली तर…

Wednesday, February 22, 2012

हृदय स्पर्शी कथा



कुठे
होतास तू, तुला अक्कल आहे का, गेले दोन तास मी सारखी तुला कॉल करतेय, बघ तुझ्या मोबाईल वर ७०-८० मिस-कॉल असतील.तुला कशी रे जरासुद्धा माझी काळजी नाही. काय समजतोस तू कोण स्वताला?
अग हो हो हो, किती ओरडशील मी तरी काय करू मला नाही जमल फोन उचलायला, काही प्रोब्लेम होता...
मला माहित आहे रे, तुला नेहमीच प्रोब्लेम असतात, खोटारडा आहेस एक नंबरचा, हल्ली खूप खोट बोलतोस माझ्याशी बसला असशील मित्रांबरोबर टवाळक्या करत आता लग्न झालाय तुझ लहान नाहीस अजून.
सोड न राग आता ये न मिठीत, मला माहित आहे तुझा राग माझ्या मिठीत आल्यावर पटकन पळून जातो...चुमंतर.....
मी नाही येणार, सोड मला, मला नाही यायचय मिठीत...

सचिन आणि सवी... एका वर्षापूर्वी दोघांचा प्रेम विवाह झाला,प्रेम खूप होत दोघांच एकमेकांवर पण सतत अशीच भांडण चालू असायची, जास्त गंभीर नसायची पण. कॉलेजपासून सचिन सवी वर खूप प्रेम करत होता, तिचाही त्याच्यावर खूप प्रेम होत, शिक्षण संपल्यावर सचिनला एक चांगली नोकरी मिळाली, स्वताच्या पायावर उभा राहिला आणि त्याने सविला डायरेक्ट लग्नासाठी मागणी घातली. तिने त्याला होकार दिला आणि त्याचं लग्न झाल.

"अग मला वाटल आपल्या सकाळच्या भांडणा नंतर तू आज तुझ्या आईकडे जाशील, आणि मग मी एकटाच असीन घरात, म्हणून मी तुला ऑफिस मधून निघताना कॉल नाही केला. आणि ज्यावेळी तुझा फोन येत होता मला वाटल अजून भांडशील त्यापेक्षा डायरेक्ट घरी जावूनच तुझा राग घालविण म्हणून हे बघ किती डेरी-मिल्क्सची चोक्लेट्स आणलीत तुझ्यासाठी."
"मला नकोयत ती...आणि मी काय सारखी भांडतच असते कारे तुझ्याशी? मला काही दुसरे उद्योग नाहीत का? मला वाटल मी सकाळी जरा जास्तीच नाटक केली,(हृदय स्पर्शी कथा) तू रागावला असशील माझ्यावर म्हणून मी पण तुझ्या आवडीची चायनीज डिश बनवण्याची तयारी करून बसली होती, मला वाटल विचारव तुला, कि तू कधी येतोयस म्हणजे तुझ्यासाठी गरमागरम बनवल असत."
"आता हे मला माहित होत का, तूच एक एसमेस करून सांगायचास ना हे. मग मी ऑफिस मधून लवकर निघून आलो असतो माझ्या लाडक्या बायकोसाठी, आतातरी ये ना मिठीत.
नाही म्हणजे नाही.... मी नाय येणार जा."
"त्यासाठी तर मी आलोय ना इथे..."
"काय? तू मला मिठी मारण्यासाठी इथे आला आहेस का? मला आधी संग तू कुठे होतास इतका वेळ ते, अन तेही खर खर संग.....
"बर मग आईक. मी ऑफिस मधून थोडा अर्धा-पावून तास उशीरच निघालो, निघायच्या आधीपासूनच तुझा कॉल येत होता, मला वाटल तू आता रागावशील आणि मी लेट झालोय म्हणून अजून भाद्क्शील, म्हणून मी फोन नाही उचलत होतो. मी विचार केला फटाफट drive करून अर्ध्या तासात घरी पोहचेन हे चोक्लेट्स घेवून. पण काय करू नेमका पावूस सुरु झाला. पावसाचा जोर इतका वाढला कि मला पुढच नीट दिसतही नव्हत, आणि तेवड्यात अचानक समोर एक ट्रक रस्त्यात बंद पडलेला दिसला पण मला काही कळायच्या आत माझी कार त्या ट्रक वर जावून जोरात आदळली. माझ्या कारचा पुढून पूर्ण चेंदामेंदा झाला आणि काचा माझ्या तोंडात आणि बाकी शरीरात घुसल्या, त्यावेळी पण तुझा फोन वाजत होता पण ह्यावेळी मला तो उचलायचा होता पण माझे हात निकामी झाले होते मी प्रयत्न करून सुद्धा फोन उचलू नाही शकलो. आणि पुढच्या पाच मिनिटात काय झाले मला काहीच कळले नाही, कोणी एक भला मोठा माणूस माझ्याजवळ आला आणि मला त्यातून अलगद उचलून वरती वरती खूप वरती घेवून गेला."

सवी खूप जोरात किंचाळून झोपेतून जागी झाली, तिला पडलेलं हे भयानक स्वप्न होत. सवी खरोखरच झोपताना सचिनशी भांडून झोपली होती आणि तिला अशीच सवय होती जर भांडण झाली असतील तर खूप फोन करत बसण्याची आणि अजून ते भांडण वाढवण्याची. तिने सचिनला एक घट्ट मिठी मारली आणि खूप रडायला लागली, तो झोपेतून जागा झालाच होता तिची किंकाळी आईकून. तो हि घाबरला होता आणि तिला विचारात होता...

"अग सवी काय झालाय, तुला बर नाही वाटत आहे का? काही खराब स्वप्न पडल का? अग शोना बोलना....काय झाल? थांब मी पाणी आणतो तुझ्यासाठी."
"हे घे पाणी, पी. आता संग काय झाल?"
मी नाही वाद घालत बसणार यापुढे तुझ्याशी, आणि तुही नको माझ्याशी वाद घालू, आणि कधी झालाच ना एखाद भांडण तर त्या वेळी आपण ते फोन वर अजिबात नाही बोलायचं, खरतर मीच नाही करणार यापुढे कधी कॉल जर भांडण झालाच तर. सामोरा समोर बसून आपण भांडण मिटवू....i love u मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय एक सेकंद सुद्धा" असे बोलत तिने पूर्ण स्वप्न सांगितले सचिनला
"i love u tooo .......मी राहु शकणार आहे का कधी तुझ्याशिवाय...बावळट कुठली."

ह्या कथेतून काय बोध घ्यायचं हे तुम्हीच ठरवा आणि मला सांगा....बघूया आपले विचार किती जुळत आहेत ते.

Monday, February 13, 2012

बदलालोय मी आता असं म्हणतात सारे



बदलालोय
मी आता असं म्हणतात सारे
विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे
पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची
सवय अजूनही आहे……!!!!

बदललाय मी माझा रस्ता
शोधल्यात आता नव्या वाटा
पण गेलोच तुझ्या घरासमोरून कधी
तर तुझ्या खिडकीकडे बघण्याची
सवय अजूनही आहे……!!!

रोज निरखतो बदलणारी चंद्रकोर
आजही वाटतो फिका,चंद्र तुझ्यासमोर
अशीच चंद्राशी तुझी तुलना करण्याची
सवय अजूनही आहे……!!!!

माझा आणि देवाचा तसा
छत्तीसचा आकडा आहे…
पण गेलोच देवळात कधी तर
तुझ्या त्या देवाकडे तुला मागण्याची
सवय अजूनही आहे……!!!

आताही जागतो मी रात्रभर
चांदण्यांनाही झोप नसते क्षणभर
मग आमच्या गप्पा रंगल्या की
चांदण्यांना तुझ्या गोष्टी सांगण्याची
सवय अजूनही आहे……!!!

एकटा-एकटा आता राहू लागलोय मी
दिवसाही तुझी स्वप्नं पाहू लागलोय मी
भंगली पूर्वीची स्वप्नं सारी तरीही
तुझ्या स्वप्नांत जगण्याची
सवय अजूनही आहे……!!!

Thursday, February 2, 2012

एक डोळ्याची आई



एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या
झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.

एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही .... रागाचा एककटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो.""कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील? मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही?मला तू अजिबात आवडत नाहीस.'' वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्‍या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो.
त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे.
त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात असतो.
एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एकाडोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, ""कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.''
""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,'' असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?) मुलगा दार लावून घेतो.
काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे बायकोला खोटेच सांगतो.
संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते.
तो वाचू लागतो,

""... मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का, असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही."तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,' असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस...''
पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्‍चात्ताप झाला, तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला; पण आता त्याचा काय उपयोग होता??
मित्रानो आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.
पण..
कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका;कारण जीवनात
एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल;
... पण
आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल !!

Wednesday, December 21, 2011

ते पण एक वय असतं



ते
पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं

ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं

ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं

ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत B.E.ची स्वप्नं पहायचं

ते पण एक वय असतं
लग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं
आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं

ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं

ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं
आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं -
प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
बिनधास्त रहायचे

Thursday, December 15, 2011

तुझी वाट पाहताना

तुझी वाट पाहताना दिवस संपतात,
पण वाट पाहणं संपत नाही.
आयुष्यावरी ल तुझी छाप पुसून... टाकणं
मला अजूनही जमत नाही.
का तुझा सहवास दरवळत राहतो आजही ?
का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता
पुन्हा वाहायला लागतात ?
का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत
राहते ?
का तुझी आठवण नको असताना येतच
राहते ??

Saturday, December 10, 2011

तुझं आणि माझं जमणार तरी कसं

तुझं आणि माझं जमणार तरी कसं,

तुला लागतो चहा मला लागते कॉफी,
तुला नाही आवडत मी उलटी घातलेली टोपी,
तुला वाटते थंडी मला होते गरम,
तु आहेस लाजाळू आणि मी अगदीच बेशरम,
तुझं आणि माझं जमणार तरी कसं.

झोपतेस तू लवकर आणि ऊठतेस पहाटे,
आवडत नाही तुला बॉक्सींग आणि कराटे,
मी माञ झोपतो बाराच्या नंतर,
रविवारी नसतं क्रिकेट शिवाय गत्यंतर,
तुझं आणि माझं जमणार तरी कसं.

फिरायला आवडत आवडत तुला शॉपिंग,
कपड्याबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग,
मला माञ खरेदीचा येतो कंटाळा,
कळत नाही रंग आहे राखाडी का काळा,
तुझं आणि माझं जमणार तरी कसं,

घालतो मी शर्ट ईस्ञी न करता,
जाऊन येतो एकटाच इतारंच ठरता,
तु माञ बघतेस मैञीणीची वाट,
बाहेर निघताना नखरे सञाशे साठ,
तुझं आणि माझं जमणार तरी कसं,
मला नसतात लक्षात बर्थडे तारखा,
जाताना बजावले तरी काम विसरतो सारखा,
तुला माञ आठवते पाचवीची मैञीण,
बारीक तुझी नजर डोळे आहेत कि दुरबिन ,
तुझ आणि माझ जमणार तरी कसं,
................................................
ऊन आणि सावली राहतात ना जसं, अगं ! तुझं माझं जमेल का तसं.......