Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Tuesday, November 8, 2011

लय हुशार पोरी..



लय हुशार पोरी..

लय हुशार पोरी..
अहो लय हुशार पोरी..
सभ्य पणाचा आव आणतात
असल्यावर घरी..
फोन आला बॉयफ्रेंन्डचा तर
बोलतात
WRONG नंबर सॉरी..
SMS
पाठऊन बोलतील
मूर्खा फोन नको करू
अरे
सगळे आहेत घरी..
मी MISS CALL करेल
आई झोपल्यावरी..
आणि दादा बाहेर गेल्यावरी..
अहो लय हुशार पोरी..
दादा लय हुशार पोरी..
काँलनी मधे शांत असतात
जणू स्वर्गा मधली परी..
खाली मान घालून येतात
येताना घरी..
आई बोलते माझं लेकरु
खरचं हाय भारी..
दुसर्या पोरींन सारखी नाय
माझी लेक ही न्यारी..
अहो कॉलेज मधे मस्तीत हिचाच
नंबर आहे भारी..
लय हुशार पोरी..
अहो लक हुशार पोरी..
आपन गाडी थांबविली तर
नाही बसणार गाडीवरी..
बोलतील काय रे खुप
भीती वाटते खरचं यार सॉरी..
पण बॉयफ्रेंन्डच्या गाडीवर ची कहानी
वर्णन न केलेली बरी..
अहो लय हुशार पोरी..
दादा लय हुशार पोरी..
मस्त पैकी देतात आपल्या हातावर
तुरी..
आपल इम्प्रेशन वाढाव म्हणून
दुसर्याच्या इज्जतिची करतात
खोबर आणि खारी..
चार शिव्या देतात
बोलतात सांगू काय तुझ्या घरी..
मग आपन कान पकडून
बोलाव लागत सॉरी..
अहो लय हुशार पोरी..
दादा लय हुशार पोरी..
सभ्य पणाचा आव आणतात
असल्यावर घरी..
अहो असल्यावर घरी
" सर्व मुली सारख्या नसतात
सॉरी "

Monday, October 31, 2011

अनुत्तरीत असलेले काही प्रश्न.............NO Tension....!!!

तीने करायचं miss तुम्ही करायचा call

तीने करायचं miss
तुम्ही करायचा call
तुम्ही धरायच्या पिशव्या
ती भटकणार mall
तुम्ही black ने काढलेली tickets
आणि ती म्हणणार...movie flop
तीचा ढगळ्, ओंगळ् झगा...
तरि तुम्ही म्हणायचं cute top
सांगा दोस्त हो is this fair.... हे काय बरं आहे ?
बायको कडे नका पाहू, मनापासून सांगा, जे खरं आहे !
तुम्ही दोघांनीही करायचं प्रेम,
पण फक्त तुम्हीच लिहायचं letter
नेहमी तुम्हीच म्हणायचं sorry
आणि ती म्हणणार thats better
तीला आवडणारं रटाळ re-mix
तुमच्या डोक्याला होणार त्रास
नेमका तीलाच कसा येतो हो...
तुम्च्या shirt ला cigarette चा वास
सांगा दोस्त हो is this fair.... हे काय बरं आहे ?
बायको कडे नका पाहू, मनापासून सांगा, जे खरं आहे !
तुम्ही आलं घालुन केलेला चहा सुद्धा,
तीला लागावा फिका...
आणि अमकी अमकीचा नवरा बघा...
सगळ स्वयंपाक करतो...........काहीतरी शिका
तुम्हीच घ्यायचा मुलांचा अभ्यास,
आणि ती पहाणार T.V.
तुमचा उद्धार झालाच म्हणून समजा...
जर घातलीत च्कून एखादी शिवी
सांगा दोस्त हो is this fair.... हे काय बरं आहे ?
बायको कडे नका पाहू, मनापासून सांगा, जे खरं आहे !
जर party मध्ये थोडिशी घेतलीत...
तर ती म्हणणार...आलात ढोसून ?
तुमची उतरेपर्यंत आणि उतरल्यावर सुद्धा..
कटकट करणार तुमच्या डोक्याशी बसून
तुमच्या आवडीचे...light orange colour चे पडदे,
ती म्हणणार..हे काय भगवं घातलय ?
bathroom चा नळ गळतोय तो बघा...
वर बघा जळमट लटकलय
सांगा दोस्त हो is this fair.... हे काय बरं आहे ?
बायको कडे नका पाहू, मनापासून सांगा, जे खरं आहे !
मला जाणवतय अत्ता
तुम्हाला नेमकं कसं वटतय...
असं वटतय की तीचं प्रेम
कुठे तरी आटतय,
हे असं वटत असतानाच,
कदचित छातीत तुमच्या कळ येईल...
क्षणात तीचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी..
सगळं सगळं उतू जाईल
तीची तगमग, धावपळ, तळमळ पाहून
तुम्हाला वाटेल धन्य,
संसाराच्या जमा खर्चात,
प्रेम जमा....भांडण शून्य
हेच fair हेच lovely , सांगा दोस्त हो वाटतय ना बरं...
तीच्या नजरेत नजर मिसळून सांगा, हेच आहे ना खरं !

Sunday, October 30, 2011

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती

Friday, October 21, 2011

ही कविता फक्त आईसाठी



ही कविता फक्त आईसाठी
अग कस सहन केल असशील
मल नऊ महिने घेउन जगण??
तुला रात्रभर जराही झोपू न देता
तुझ्या मांडीवर माझ ते रडण??

आई, आज मला तुझी खूप् आठवण येतेय
कारण आज मी सपशेल हारलोय
म्हणून परत तुझ्या त्या लढवय्या जीवनाची
स्वत:ला आठवण करुन देतोय
माझ्याकडे जे काही आहे ते फक्त
आणि फक्त तुझच आहे...
आत्मा आणि ईश्वर यांचा मेळ म्हणजे आई
हे म्हणतात ते खरच आहे....

मला अजूनही आठवतय
तू मला वीरांची गाथा सांगायचीस
आता वाटतय खरोखर
तोच तू वीर असायचीस

आई तू माझी आजिबात काळजी करु नकोस
आज पडलोय, उद्या उठीन
तूझ्या गोष्टीतल्या त्या वीरासारखा
आणि तू शिकवल्यासारखा फक्त लढीन

तू म्हणायचीस आयुष्यात आधी लढायच
असत आणि मग जिंकायच असत
तू घडविलेला , तुझा हा वीर
तुझी ही शिकवण वाया जाऊ देणार नाही...

Thursday, October 20, 2011

मैत्री विरुद्ध प्रेम

मैत्री विरुद्ध प्रेम

                        एका मुली - मुलात कधीनिखळ मैत्री का हो नसते ?




मैत्री विरुद्ध प्रेम
================
एका मुली - मुलात कधी

निखळ मैत्री का हो नसते ?

नेहमी त्यांच नात काहो

प्रेमा वरती येवून फसते ?

मैत्रिणी -मैत्रिनित गप्पा

आणि मित्रा -मित्रात मजा

मुली -मुलाच्याच मैत्रीला


प्रेमाची व्हावी सजा ?

विरुद्ध लिंगी आकर्षण

आणि खो घालतो सहवास

हळू हळू वाढते जवळीक

अन सुरु प्रेमाचा वनवास

उनाड पोरांच्या घोलक्या मधून

तो थोडा वेगला होतो

प्रेमाच्या त्या जादुपोटी

कावळ्यांमध्ये बगळा होतो

तीही नंतर दूर होते

चिव चिवनार्या सखिंपासून

त्या बिचार्या पाहत रहातात

तीच वागन आ वासून

त्या दोघांच बोलन मग

विषय विषायानी वाढत जात

मैत्री सारख पवित्र प्रेम

आकर्षणवर थांबत जात

दोघे नंतर वेगळे होतात

निरोप देतात मैत्रीला

विराम पडतो त्यान्च्याशिवाय

हास्यविनोद अन मस्तिला

मित्र फक्त मित्र बनतात

औपचारिकतेने बोलायला

सख्या फक्त सख्या रहातात

खोट्या गप्पा तोलायला

त्या घोलक्यातिल मुला मुलित

दरी पडत जाते खोल

प्रत्येकाला मिलते साथ

ढासळत जातो मैत्रीचा तोल

मैत्री मधली शुद्धता

प्रेमामुळे झिरपत जाते

प्रेम आणि मैत्रीमध्ये

मैत्री तेवढी विखारत जाते

हेवा वाटावा अशी दोस्ती

हळू हळू फ़स्त होते

फटकळ अशा प्रेमासाठी

खरी मैत्री पण स्वस्त होते

खरी मैत्री पण स्वस्त होते

पप्पा माझे लग्न करा पण

पप्पा त्याने जग नाही जिंकले तरी चालेल पण मला तरी जिंकणारा असावा .
.
पप्पा माझे लग्न करा पण ....!

पप्पा पत्रिकेचा नंतर विचार करा पण आधि H I V टेस्ट करा

पप्पा त्याचा रंग सावळा असलातरी चालेल

पण मनाने गोरा असावा...


पप्पा त्याचे केस लाल असलेतरी चालेल

पण हुंडयासाठी हाल हाल करून

जाळून पोळून भाजून मारणारा नसावा ......

पप्पा त्याच्या चेहेर्यावर डाग असलातरी चालेल

पण चरीत्र्यावर डाग नसावा .......


पप्पा त्याच्या डोक्यावर केस नसले तरी चालेल

पण त्यावर डिपार्टमेंटची एकही केस नसावी .......

पप्पा त्यानी चटणी भाकरी खालली तरी चालेल

पण व्याजाने पैसे काढून पाचपकवान खाऊ घालणारा नसावा......


पप्पा तो लेझिम खेळण्यात तरबेज असावा

पण रोज रात्री घरी येताना लेझिम खेळत येणारा नसावा ......

पप्पा तो छत्रपती शिवाजी राजे भोसलेसारखा लढवया असावा,

अशोक कामटेसरखा देशासाठी मरणारा असावा

पण एड्स सारख्या पांचट रोगाने मरणारा नसावा .....


पप्पा तो अण्णाभाऊ साठे सारखा जन जागृती

पोहाडे मानणारा असावा

पण अचाट विचाट शिव्या देणारा नसावा .....

पप्पा तो फाशी घेणारा नसावा पण भगतसिंग सारखा

देशासाठी फासावर जाणारा असावा .......


पप्पा तो संभाजी राजांसारखा वाघाचा

जबडा फाडणारा असावा पण

गुटकाची पुडी टरा टरा फाडणारा नसावा .....

पप्पा तो भावांमध्ये द्वेष करणारा नसावा,


संत रोहीदास सारखा आई वडिलांची सेवा करणारा असावा .....

पप्पा त्याने जग नाही जिंकले तरी चालेल

पण मला तरी जिंकणारा असावा .