Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Monday, July 10, 2017

साखरपुड्यात अंगठी अनामिकेतच का घालतात?





साखरपुड्यात वधू-वर एकमेकांच्या अनामिकेत
अंगठी घालतात.
ही अंगठी अनामिकेतच
का घालतात?
एका तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख
मांडणी (प्रयोग करून)पहा...
.
त्याच्या मते, आपल्या हाताची
दहा बोटे. हे एक कुटुंब.
.
.त्यातील अंगठा हे आपल्या आई-
वडिलांचे प्रतीक.
.
अंगठ्याजवळचे बोट आपल्या भावंडांचे
प्रतीक.
.
मधले बोट म्हणजे आपण स्वत:
.
चौथे अनामिका...
म्हणजे आपला जोडीदार,
.
.तर करंगळी म्हणजे
आपली अपत्ये.
.
ही झाली गृहीतकं.
आता पाहू या कुटुंबातील
या घटकांशी आपली नाती कशी आहेत
ती.
.
आता फोन बाजूला ठेवा
आपल्या
हाताचे तळवे नमस्काराप्रमाणे
जोडा.
.
मधली बोटे आतील बाजूस खाली दुमडून
बाकी बोटांची फक्त वरची टोकं
जुळवा.
आता प्रथम अंगठे एकमेकांपासून दूर
करा. ते
उघडता येतील.
.
.कारण आई-वडील काही जन्मभर
लाभत
नाहीत. कधी ना कधी ते
आपल्याला सोडून जातात.
.
अंगठे मिटवून त्याच्या शेजारील बोटे
उघडा.
तीही उघडतील.
कारण भावंड त्यांना त्यांची कुटुंबं
आहेत.
स्वत-ची आयुष्यं आहेत.
.
आता ती बोटं जुळवून
आपल्या करंगळ्या उघडा.
.
त्याही उघडतील. कारण तुमची मुलं
मोठी झाल्यानंतर
घरटं सोडून भरारी घेणारच आहेत.
.
आता करंगळ्या मिटा आणि अनामिका एकमेकांपासून
वेगळ्या करा.
.
आश्चर्य वाटेल;
 पण त्या वेगळ्या होत नाहीत. कारण जोडीदार, म्हणजे पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात. ते सुखात आणि दुखातही एकमेकांना साथ देतात...!
''आयुष्यास आहे सुंदर अर्थ
अनामिके शिवाय सारे व्यर्थ ''
🙏🌹🌹🌹🌹

Tuesday, November 4, 2014

लग्न म्हणजे काय असतं?



 तो कितीही वेंधळा असला तरी

त्याला सांभाळून घ्यायचं असतं
तिने कसाही स्वयंपाक केला तरी
त्याला "मस्त" म्हणायचं असतं 😛

लग्न म्हणजे काय असतं?

क्रिकेटमध्ये कितीही interest नसला तरी
त्याच्यासाठी ते enjoy करायचं असतं
तुळशीबागेत जायचा कंटाळा आला असला तरी
तिच्यासोबत आनंदाने जायचं असतं 😀

लग्न म्हणजे काय असतं?

तो कितीही "म्हातारा" झाला तरी
त्याला चिरतरूण भासवायचं असतं
"मी जाड झालेय का?" या वाक्याला
कधीही "हो" म्हणायचं नसतं

लग्न म्हणजे काय असतं?

दोन्ही घरच्या नात्यांना 
आपुलकीने जपायचं असतं
वेळप्रसंगी आपल्या इच्छांना 
हसत हसत विसरायचं असतं

थोडक्यात काय?
लग्न लग्न म्हणजे काय असतं?

छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये
केलेलं Compromise असतं
कारण "We will grow old together"
असं एकमेकाला केलेलं Promise असतं...




Thursday, August 7, 2014

काय वाटलं तिला बघून ?


काय वाटलं तिला बघून ?
गेलास की नाहीस हरखून ?
अशी छान मैत्रीण आपल्याला मिळेल ...
असं वाटलं होतं का मनातून?


बहुतेक पुरुषांची असते इच्छा
आपल्याला छानशी मैत्रीण असावी
ती आपल्या मनासारखी वागावी
पण बायकोसारखी नक्कीच नसावी


आपलं तिच्याशी छान सूत जमावं
तिने अल्लड पण समंजस असावं
आपलं म्हणणं तिला लग्गेच कळावं
पण बायकोसारख तिने न छळाव


आपल्याकडे तिने काहीच मागू नये
स्वतःचे बिल आठवणीनी द्यावे
जमल्यास आपले पण पैसे भरावे
बायकोसारख टुमण न लावावे


आपल्याशी तिनी भरपूर गप्पा माराव्यात
निरनिराळ्या विषयांवर चर्चा कराव्यात
जमल्यास नवऱ्याच गाऱ्हाणं सांगावं
ते ऐकून आपण खूष होऊन जावं


दिसायला सुंदर ती असलीच पाहिजे
ग्रेसफुल असली तर अजून काय पाहिजे ?
आपण म्हणू तेंव्हा ती भेटली पाहिजे
बाकीच्यांची जळजळ कळली पाहिजे


अशी छा sss न मैत्रीण नशिबानं लाभते
त्यासाठी हातावर वेगळी रेषा असते
सगळ्यात गमतीची गोष्ट ही असते
ती पण कुणाची तरी बायको असू शकते



Friday, November 9, 2012

वसुबारस आणि महत्त्व


वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी) 
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.


धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी)
धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतकयांच्या दृष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने व गूळ ह्यांचा नैवेद्य दाखवतात.ह्या सुमारास झडू व शेवंतीची फुले मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झडूची व शेवंतीची फुले वापरतात. या दिवसापासून दारांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.

नरक चतुर्दशी (आश्विन वद्य चतुर्दशी)
आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले. ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात.स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. स्नानानंतर मुले फटाके उडवतात. या दिवशी पहाटेच पणत्या लावतात. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरितां अशा पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.

लक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या)
या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात.

पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा / बलिप्रतिपदा)
बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर करतात.
भाऊबीज (कार्तिक शुद्ध द्वितीया / यमद्वितीया)
या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊ बहिणीकडून ऒवाळून घेतो. भाऊ तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ऒवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात. या दिवशी ज्याला मरण येईल त्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात.



Saturday, May 12, 2012

हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो




                     समजत नाही की मी घडलो की बिघडलो
                   तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो

                    पैसा हीच शक्ती समजून ईश्वरभक्ती विसरलो

                      सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो

                   सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलो

                     भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो

                       धन जमा करताना समाधान विसरलो

                  तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो

                  परिक्षार्थी शिक्षणात हाताचे कौशल्य विसरलो

                      टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो

                  जाहिरातीच्या मार्‍यामुळे चागलं निवडणं विसरलो

                        गाडी आल्यापासून चालणं विसरलो

                     मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलो

                      कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो

                    संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो

                    संकरीत खाल्यामुळे पदार्थांची चव विसरलो

                   फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो

                    ए.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो

                    परफ्युमचा वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो

                       चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो

                    जगाचा भूगोलात गावाचा इतिहास विसरलो

                   बटबटीत प्रदर्शनात सौंदर्याचे दर्शन विसरलो

                    रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलो

                  मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो

                 स्वतःमध्ये मग्न राहून दुस-‍याच्या विचार विसरलो

                      सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो

                   जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो

Wednesday, March 28, 2012

बर झाल नाकारलस


बर झाल नाकारलस


नाहीतरी कुठे मी इतका चांगला आहे ?

बर झाल नाकारलस

कारण मनातल्या प्रेमाचा रंगही आता भंगला आहे




बर झाल नाकारलस

नाहीतरी वेळ कुठे आहे तुला माझ्यासाठी

आणि मी भेटायच ठरवल

तरी भेट काय घ्यावी तुझ्यासाठी



बर झाल नाकारलस

नाहीतरी तूझे शौक परवडनारे नव्हते

देण्यासाठी प्रेमच उरले

तेवढेच तुला दिसत नव्हते



बर झाल नाकारलस

नाहीतरी माझ्या भावना तुला समजतच नव्हत्या

ओल्या ठेवल्या भरपूर रे

पण तया हृदयातल्या ह्रुदयातच सुकत होत्या



बर झाल नाकारलस

कारण विरहाची मला सवय आहे

परत परत प्रेमात पडायच

हेच तर खर वय आहे



बर झाल नाकारलस

नाहीतरी तुझ्या आठवणीचा नुसता खच पडला आहे

तू दिलेल्या चोकलेटचा कागद

अजुनही पाकिटात तसाच दडला आहे



बर झाल नाकारलस कारण

त्या चोकलेटची चव जिभेवरून उडली आहे

बर झाल नाकारलस

त्यातली थोडीशी गोडी ह्रुदयात माझ्या उरली आहे



बर झाल नाकारलस

कारण दुराव्यताही मजा आहे

तुझ्या विरहात कविता लिहिण्याची

हीच तर खरी नशा आहे
-- 

देशात काय चाललय


परवाच एका स्फोटात मेलो.पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो.स्वर्गात जाताच टिळक भेटले.नमस्कार म्हणताच प्रसन्न हसले.टिळकांनी विचारले, स्वातंत्र्यानंतर बदललय का काहि ?म्हटल छे हो, सरकारच डोक ठिकाणावर नाहि.आजही स्वातंत्र्यासाठी आम्ही रक्तच देतो.पण आझाद मात्र काश्मीर होतो.दुरवर सावरकर दिसले म्हणुन धावलो.म्हटल तात्या आज जन्माच पुण्य पावलो.ते म्हणाले, सध्या तरी सगळ निवांत आहे.स्वर्गात काँग्रेसवाला नाहि तर सगळ शांत आहे.त्यांनाच विचारले तात्या इथे शिवराय कुठे राहतात.म्हणाले ते, पहा सौधातुन आपल्याकडेच पाहतात.छत्रपतीँचा विजय असो म्हणुन चटकन हात जोडले.पण घडले भलतेच, ते मझ्यावरच ओरडले.काय रे ? कोण्या जेम्स लेनने म्हणे बत्तमीजी केली.तुमची अक्कल तेव्हा सांगा कोठे चरायला गेली ?मान वर करायची माझी हिम्मत होत नव्हती,आणि महाराजाची नजर माझ्यावरुन ढळत नव्हती.मी म्हणालो, कबुल आहे महाराज तुमची स्वप्न आम्हाला कळलीच नाही.पैसा सोडुन आमची नजर दुसरीकडे वळलीच नाही.पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे नेमके आवाज हेरतात,ब्र म्हणायचा अवकाश लगेच गाढवाचे नांगर फिरवतात.खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो,कोणीही आपल्या गाडीखाली गरिबांना चिरडतो.हे सगळे ऐकुन महाराजांच्या गालाचे कल्ले थरारले,आमच केविलवाण जग पाहून डोळ्यात पाणी तरारले.क्षणभर राजेपण विसरुन ते दुःखाने थरथरले,आणि मग आमच हे अस वगण बघुन रागाने बिथरले.पाय लटपटले मला वाटले आता कंबख्ति भरली म्हणुन समज,चुकिची शिक्षा गर्दन मारलीच म्हणुन समज.पण मेलेल्यांना मारायला ते खुर्चीतले नेते नव्हते,न्याय कठोर असले तरि ह्रदय त्यांचे रीते नव्हते.मान खाली घालुन तसाच पुढे गेलो.अहम आश्चर्यम स्वर्गात मला औरंगजेब भेटला,म्हणे काफरांना मारुनच तर स्वर्ग गाठला.जिन्हा सुद्धा तिथेच होता.म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखांवर जाईल,आणि मग स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल.त्याला म्हणालो जरी स्वर्गाची फाळनी होनार आसेलतरी 55कोटी द्यायला गांधी स्वर्गात नसेलतुम्ही आजून किती मागनार दूस~यांकडून आडोसेईथे पून्हा जन्म घेतील हजारो नथुराम गोडसेत्याला मूतोड जवाब देवून तसाच पुढे निघालोस्वर्गात मला महात्मा फुले भेटलेत्यांना पाहून डोळ्यात माझ्या आश्रूंचा सागर दाटलाकस सांगु तूम्हाला खाली आता शिक्षनाचा काळा बाजार थाटलाहे सर्वजन रात्री मला एकत्र भेटले .आजच्या माणसाची व्यथा ऐकुन रागाने पेटलेते म्हणाले,आम्ही केलेल्या कार्याला काहीच नाही का अर्थ ?आमचे प्रयत्न, आमचे बलीदान सगळेच कसे गेले व्यर्थ ?शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातच भ्रष्टाचार कसा काय आलामाणसाच्या स्वार्थी वृत्तीमूळे सामान्य माणूस पूरता बेजार झालामंदिर, मुर्ती, पुतळे बांधुन देवधर्म तुम्ही करतापण माणसातील खऱ्याखूऱ्या देवालाच तुम्ही  पुन्हा पुन्हा मारतासर्व जीवांमध्ये मानवाला सर्वात श्रेष्ठ बनवलपण या माणसानेच आज माणसातील माणुसपण नष्ट केलबोलताना वाईट वाटते पण आता वेळ आली आहे विचार करण्याचीखरच चुकी केली का माणूस हा प्राणी बनवण्याचीबोलून बोलून थकले आणि झाले सगळे शांतअसे वाटले मरण त्र आलेच होते पं हा आहे कायमचा एकांत अजूनही वेळ गेली नाही सुधारा आपले आयुष्यनाहीतर मनुष्याच्या विनाशाला कारणीभूत ठरेल फक्त आणि फक्त मनुष्य ..........!!


Wednesday, March 21, 2012

एक अश्रू..

एक अश्रू..
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा.. तो अश्रू.... हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही..........


एक पाऊल..
तुझ्यासाठीच अडखळणारं,
तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..
तुझी पाऊलखूण शोधणारं..


एक नजर..
जी सारखी तुलाच शोधते...
प्रत्येकाच्या डोळ्यात..
तुझीच छबी शोधते..
मागे वळून .. पुन्हा पुन्हा.. तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..


एक मिठी..
तुझ्याचसाठी रिकामी..
तुझ्याशिवाय मोकळी..


एक कुंचला..
तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला..
तू येऊन पुन्हा..
रंग भरशील माझ्या आयुष्यात..
अशी आस लावणारा..


एक जीव..
तडफडणारा.. असहाय्य..
तुझ्याविना.. तुझ्याचसाठी...

Monday, March 12, 2012

मला आवडणाऱ्या काही साध्या-सोप्या गोष्टी लिहीतो

रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत. मग निराशा येते, राग येतो आणि आपली खूप चिडचिड होते. आपण रागावलो की तो राग मित्रांवर किंवा घरच्यांवर काढला जातो. मग राग गेला की आपल्याला वाईट वाटतं, आपण त्यांची क्षमा मागतो आणि ते आपल्याला माफही करतात. पण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. आपण ज्या कारणामुळे चिडलो होतो ती गोष्ट शुल्लक वाटू लागते.
असं झालं की मला एक गोष्ट आठवते. एक माणूस देवाचे आभार मानत असतो. तो म्हणत असतो की "माझ्याकडे नवे बूट नव्हते म्हणून मी दु:खी होतो त्या वेळी तू मला एक माणूस दाखवलास ज्याच्याकडे पाय पण नव्हते. मग माझी तकरार आपोआप मुकी झाली." थोडक्यात सांगायचं तर आपण छोट्या दु:खांकडे लक्ष देऊन त्यांना मोठं करतो पण छोट्या सुखांकडे लक्षच देत नाही. जसं बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होत नाहीत, तसं त्याहून कितीतरी जास्त गोष्टी आपल्याला खुश करायचा प्रयत्न करत असतात. पण आपल्या एक लहानशा दु:खाच्या नादात आपण त्या दहा खुश करणाऱ्या गोष्टींना विसरतो.

जर आतापर्यंतचे विचार पटले असतील, तर मनात एक प्रश्न पण आला असेल. आपण या लहान सुखांकडे लक्ष कसं द्यावं? काही मनासारखं नाही झालं तर त्याला पटकन मनातून बाहेर काढून जे आपल्याला सुख देतं ते कसं करावं? याचं उत्तर माझ्या एका मैत्रिणींकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. त्या म्हणाल्या की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काही नाही' आसं म्हटलं की त्या 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायच्या. मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. त्या पण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायच्या.

पण काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठतास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला अशी आमची उत्तरं येऊलागली. मग त्यांच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊलागतात.

तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. जसं आपण बंद असलेल्या मंदिरासमोरून जाताना पण 'आत देव आहे' या विश्वासाने नमस्कार करतो, तसं या प्रयोगावर पण विश्वास करून बघा. अट फक्त एकच, की तुम्ही 'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे. हा प्रश्न स्वत:ला तर विचाराच, पण आपल्या मित्रांना किंवा घरातल्या व्यक्तिंना विचारा. उत्तर कितीही शुल्लक वाटलं तरी नीट ऐका, तुमचं उत्तर पण सांगा. बघा तुम्हाला पण मस्त वाटेल आणि तुमच्या मित्रांना पण. हा प्रश्न खूप बाळबोध वाटतो, किंवा मित्र चेष्टा करतील असं वाटत असेल तर आधी काही दिवस स्वत:लाच विचारा. मग एकदा तुम्ही रोजच्या दिवसाचा आस्वाद घेऊलागलात की मित्रांना विचारा 'आजची चांगली गोष्ट काय?'

आता शेवटी मी मला आवडणाऱ्या काही साध्या-सोप्या गोष्टी लिहीतो. खाण्यावरून सुरूवात केली तर तेलकट तरी आणि तिखट मिसळ, आईस-क्रिम, उन्हात फिरून आल्यावर उसाचा रस, पुण्यातली सुजाताची मस्तानी, पाऊस पडत असताना गरम गरम भजी, रात्री झोपायच्या आधी एक छोटं चॉकलेट, आईच्या हातचं जेवण, हापूस आंबा असे असंख्य पदार्थ आहेत. हे रोज एक एक करून खायचं असं ठरवलं तरी वर्षाच्या 'चांगल्या गोष्टींची' यादी होईल. रेडिओ वर अचानक लागलेलं आपल्याला आवडणारं गाणं, हे पण एक वेगळंच सुख आहे. त्यात ते गाणं थोडं जुनं असेल आणि आपल्याला त्याचा विसर पडत असताना ते लागलं तर मग अजूनच मस्त वाटतं. पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा सुगंध पण हृदयात सुकलेल्या भरपूर आठवणी परत ओल्या करून जातो. आपण नवी साडी किंवा नवा शर्ट घातला की होणारी प्रशंसा हे पण एक छोटंसं सुखच आहे. अंघोळ करून स्वच्छ झाल्यावर अंगावर मारलेलं अत्तर, आपल्याला दिवसभर त्याच्या सुगंधाने ताजंतवानं ठेऊशकतं. अशा कितीतरी लहान वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला खूप आनंद देऊशकतात, जर आपण त्यांना आनंद द्यायची संधी दिली तर…