Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Saturday, August 6, 2011

ज़रा हसुया



* हल्लीच्या माणसांनी किती ताळतंत्र सोडलायं, काही कल्पना आहे का?...
.. अहो , आपल्या स्वयंसिद्ध बापुंचं प्रवचन सुरु असताना भक्तगणांमधला एकजण चक्क आरामात
सिगरेट ओढत होता... हे दृश्य पाहुन मला एवढा धक्का बसला की हातातला बिअरचा कॅन निसटून
खाली पडला!!!


* यशाच्या मार्गावर नेहमीच ' अंडर कन्स्ट्रक्शन'ची पाटी लटकत असते......

* सदैव ' आणि 'कधीच नाही'
हे शब्द कधीच वापरू नयेत हे सदैव लक्षात ठेवा.


* पहिले चाक ज्याने शोधून काढले, त्याचे एवढे कौतुक कशाला? इतर तीन ज्यांनी शोधली, ते खरे
कौतुकाला पात्र आहेत!!!!


* माणसांचीही गंमत असते पाहा. तुम्ही एखाद्या माणसाला सांगा, आकाशगंगेत ३०० अब्ज तारे आहेत
... तो चटकन विश्वास ठेवतो. पण, पार्कातल्या बेंचला नुकताच रंग लावलाय, तो ओला आहे असं
सांगा... तो स्वत : हात लावून बोटं बरबटवून खात्री करून घेतल्याशिवाय राहात नाही!!!!



* का ? का? का?
१ पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल , तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात?
२ स्टेडियममध्ये जिथे प्रेक्षक ' बसतात' त्या जागेला 'स्टँड' का म्हणतात?
३ जगात सर्वांना स्वर्गात जायचं असतं, पण मरायचं कुणालाच नसतं, असं का ?
४ बुद्धिबळाच्या पटावरही वर्णभेद असतो का ? नसेल, तर मग पांढऱ्या सोंगट्यांना पहिली चाल
का?



* height of Optimism
99 वर्षांची म्हातारी जेव्हा ' हच का नया लाइफटाइम रिचार्ज' घेते!



* जुनी मोटर कार खरेदी करावयाची असल्यास , तिची योग्य किंमत ठरविण्याची पद्धत
जी कार आवडेल ती दोन तास ट्रायलसाठी मागून घ्यावी व अशाच दुसर्‍या जुन्या गाड्यांच्या
डिलरकडे घेऊन जावी. त्याला सांगावं की , तुम्हाला ही गाडी विकायची आहे. किती किंमत येईल
?
तो सांगेल ती किंमत गाडीची खरी किंमत !


* मार्क ट्वेन हा अतिशय बुद्धिमान आणि खोचक विनोद करणारा लेखक होऊन गेला .
त्याची काही निरिक्षणे जगप्रसिद्ध आहेत.
त्याचा हा सर्वांगसुंदर विनोद
" जेंव्हा एक तरुणी एका तरुणाच्या हृदयावर डोके ठेवते ;
तेव्हा मला फ़ार गंमत वाटते .
त्याला हृदय नसतं ;
आणि
तिला डोके नसतं ...."





कुणी का गणते | श्रम माझे?



सकाळी उठावे | सुसाट सुटावे |
ऑफिस गाठावे | कैसेतरी ||

इच्छा गं छाटाव्या | पोळ्या अन् लाटाव्या |
वेळाही गाठाव्या | सगळ्यांच्या ||

चढावे बशीत | गर्दीत घुशीत |
रोज या मुशीत | कुटताना ||

धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम |
गाठण्या मुक्काम | सोस बये! ||

उशीर अटल | चुकता लोकल |
जीवही विकल | संभ्रमित ||

लागते टोचणी | भिजते पापणी |
जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? ||

मस्टर धोक्यात | छकुला डोक्यात |
आयुष्य ठेक्यात | बसेचिना ||

रोजची टुकार | कामे ती भिकार |
बंड तू पुकार | बुद्धी म्हणे ||

एक तो 'वीकांत' | एरव्ही आकांत |
समय निवांत | मिळेचिना ||

तेव्हाही आराम | असतो हराम |
कामे ती तमाम | उरकावी ||

लावून झापड | शिवावे कापड |
तळावे पापड | निगुतीने ||

कामसू सचिव | सखीही रेखीव |
गृहिणी आजीव | प्रियशिष्या ||

काया रे शिणते | मनही कण्हते |
कुणी का गणते | श्रम माझे? ||

आपल्याला पण एक मैत्रिण असावी



आपल्याला पण एक मैत्रिण असावी!
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी
घर जवळ येताच पुढे निघून जावी
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी
दिसलो की गालवर छान खळी पडावी
कधी हसता हसताच ती रडावी
कधी रडता रडताच खुद्कन हसावी
हक्काने आपल्यावर रागवावी
मग कही न बोलताच निघून जावी
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी
सुखात सगळ्यांना सामिल करावी
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी
थोडा वेळ मग ती शांत रहावी
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी
ती बरोबर असली की आधार वाटावी
आपल्याला पण एक मैत्रिण असावी .....

ती एकदा आजीला म्हणाली

आयुष्य खूप सुंदर आहे,



आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन .........
आयुष्य खूप सुंदर आहे,

बंड्याचे पत्र - पुणेकर

ती . बाबा आणि सौ . आईस , बंड्याचा शि . सा .न .वि .वि . मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप येऊन पोहोचलो . तुम्ही लगोलग मला बाईक घेऊन दिल्यामुळे माझी कॉलेजला आणि क्‍लासला जाण्याची मस्त सोय झालीय बरं का ! पुण्यात बाईक चालवायला जबरी मजा येते. पुणेकरांचे आवडीचे पूर्वीचे वाहन म्हणजे सायकल . आपल्या गावात देवाला सोडलेल्या रेड्याला जसे कोणीही काहीही करत नाहीत , तसेच इथे सायकलस्वारांना कोणताही नियम लागू नाही . पोलिसांची नजर चुकवून आणि शिट्टीचा इशारा ऐकून न ऐकल्यासारखे करून हे झक्‍कासपैकी पसार होतात. काय करणार ! सध्याचे लाइफच धावपळीचे झाले आहे . त्यांचा दोष कसा गं म्हणता येईल आई ? इथल्या दुचाकीचालकांना ऊर्जाबचतीचे महत्त्व खूपच पटले आहे . त्यांच्या वाहनावरसुद्धा तीन जण आरामात बसतात . सिग्नलपाशी लाल दिवा असला तरी ते सहसा थांबत नाहीत ; कारण त्यामुळे पेट्रोल जास्त जळते . मी कुठेसे वाचले , की वळताना हात दाखवायचा, तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे. म्हणून हात दाखवायचे कष्ट कोणी घेत नाहीत. शिवाय हात दाखवून अवलक्षण करू नये म्हणतात. त्यामुळेच की काय काही रिक्षाचालक पायाने वळण्याचा इशारा करतात. इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात . आहे ना गंमत ? शाळांचे रिक्षावाले काका खूप प्रेमळ असतात . रिक्षात १२ - १५ मुले घेऊन ते मायेची भूक कशीबशी भागवितात. आई, पुणेकर फार लठ्ठ होऊ लागलेत असा अहवाल मध्यंतरी तू वाचला असशीलच. त्यावर उपाय म्हणून रिक्षावाले फक्त लांब अंतरावरचे प्रवासी स्वीकारतात . बसचालकांनाही पुणेकरांच्या लठ्ठपणाची खूप काळजी वाटते . त्यामुळे ते स्टॉपच्या अलीकडे किंवा पलीकडेच बस थांबवितात. बाबा , येथील वाहतूक पोलिस पर्यावरणाबाबत सजग आहेत . एक कागद बनविण्यासाठी अनेक झाडे तोडावी लागतात. त्यामुळे नियम तोडणाऱ्याला कागदाची पावती फाडून दंड करणे ते गुन्हाच समजतात . मध्यंतरीच्या वादामुळे मोटारचालकांचा " लेन' या शब्दावर खूप राग आहे . "लेनची शिस्त पाळा ' असा फलक वाचला , की ते हटकून ती सूचना धुडकावतात . बाबा, दुसरी आनंदाची बातमी म्हणजे मला लायसन्स अगदी होस्टेलपोच मिळाले . कसे ते मात्र गावाला आलो की सांगेन ! ( ता . क. - बंटीला मोकळ्या मैदानात सायकल शिकवू नका. मे महिन्यात मी त्याला कर्वे रस्त्यावर दोन दिवसांत शिकवेन) तुमचा लाडका बंड्या

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला


बाप्पा
परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला
उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला
तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक
इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश कारेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सार मॅनेज होत नाही
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत
इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग
तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात
माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन
एम बी चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ?
असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको
परत येउन मला दमलो म्हणायला नको
माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश
माग म्हणाला हवं ते एक वर देतो बक्षिस
सी ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप
मी हसले उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं
'पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं '
'सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं'
'हवा आहे परत मानासाताला हरवलेला भाव'
'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव '
'देशील आणून परत माज्ही हरवलेली नाती '
'नेशील मला परत जिथे आहे माझी माती '
'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं '
'आईबापाचं कधीही फ़िटणारं देणं '
'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर '
'भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार '
'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान'
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?
"तथास्तु" म्हणाला नाही सोंडेमागून नुसता हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा "सुखी रहा" म्हणाला बाप्पा माझा.

Tuesday, August 2, 2011


व्हीस्की आणखी रम यातुनी, कोण आवडे अधिक तुला ?

सांग मला रे सांग मला !!

व्हीस्की दिसते गोजिरवाणी, थोडा सोडा थोडे पाणी !
बर्फ टाकूनी मजेत प्यावी, ग्लास भिडवूनी ग्लासाला !

व्हीस्की आवडे अधिक मला !!


गोजिरवाणी दिसते व्हीस्की, परंतु असते भलती रिस्की !

सकाळ होता डोके चढते, जाउ न देई कामाला !

आवडते रे रम मला !!


काळी, सावळी असते रम, थंडीमध्ये करी गरम !

कोल्यामध्ये मिसळूनी घेता, कळे न काही कोणाला !

रम आवडे अधिक मला !!


थंडीमध्ये करी गरम, नशेत नसतो काही दम !

व्हीस्की पिता विमान उडते, सुसाट जाई आभाळा !

व्हीस्की आवडे अधिक मला !!


व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते !

व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला !

व्हीस्की आवडे अधिक मला !!


'तशी'च घेता रात्री भाई, थंडी वारा लागत नाही !

सुखे बायको झोपे म्हणूनी, पुण्य लाभते पाप्याला !

रम आवडे अधिक मला !!


नकोच रम, नकोच व्हीस्की, मदिरेहूनही विवाद रीस्की !

थंडगार चल बियर पिऊ, काठोकाठ भरू प्याला !

बियर बरी रे तब्येतीला !!!!!

वारस होऊ अभिमन्यूचे


वारस होऊ अभिमन्यूचे

अनुसया गोरे यांना 'वीरमाता' आणि 'हिरकणी' हे पुरस्कार मिळाले आहेत.त्या एका शहीद सैनिकाच्या आई असल्याचा त्यांना फार अभिमान त्यांच्या मते आपण आपल्याला हवे ते शिक्षण घ्यावे पण नंतर मात्र भारताच्या सैन्यदलात सामील व्हावे. आजही भारतीय सैन्यदलात अनेक मोठमोठ्या पदव्या मिळालेले अनेक सैनिक आहेत. देशसेवा करण्याचा हा उत्तम मार्ग आहे, असे त्या म्हणतात.

जेव्हा काही वर्षांपूवीर् भारत विश्वचषक जिंकला होता तेव्हा सगळीकडे फटाके आणि आतषबाजी लावल्या होत्या. परंतु, त्याच दिवशी एक विपरित घटना घडली. जिच्याबद्दल आपण कल्पनाही करू शकत नाही. पाकिस्तानने युद्धकैदी बनवलेल्या काही भारतीय जवानांचे मृतदेह आपल्या ताब्यात दिले. त्या मृतदेहांची फार दुरवस्था केली होती. त्या मृतदेहाचे डोळे काढले गेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर सिगारेटच्या चटक्यांचे डाग होते. आजतगायत ही गोष्ट अनेकांना माहीत नाही. आपण मात्र विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत होतो. हे कळल्यानंतरही आपण पाकिस्तानशी मैत्रीचे करार करतो, त्यांच्याबरोबर क्रिकेटचे सामने खेळतो, पाकिस्तानी कलाकारांच्या विनोदावर हसतो आणि त्यांच्या नटांचे सिनेमे पहायला जातो. ही तर लाजिरवाणी बाब आहे.

आज नोकरी मिळवण्यासाठी मोठ्या पदव्या घेतलेले विद्याथीर् झटत आहेत. भारतीय सैन्यदलात सुमारे २५ ते ३० हजार जागा रिकाम्या आहेत, याची कल्पनाही नसेल. देशातल्या युवा पिढीला या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारं कोणी नाही. सरकारी नोकरी असल्याने पगार चांगला व निवृत्ती-नंतरचे वेतनही जास्त मिळते. देशासाठी काही केल्याचा अभिमानवाटतो.

पाकिस्तानात उलट्या टांगल्या गेलेल्या आपल्या तिरंग्याबद्दल आपले गृहमंत्री 'छोटीसी गलती' असे संबोधतात. उलटा टांगलेला झेंडा म्हणजे युद्धात पराभव झालेल्या देशाचा झेंडा जिंकलेल्या देशात उलटा टांगला जातो; याची त्यांना साधी कल्पनाही नव्हती. एका जवानासाठी त्याच्या देशाचा झेंडा म्हणजे जणू काही त्याचा प्राणच असतो. स्वत:चा जीव गेला तरी तो आपल्या झेंड्याचा अपमान होऊ देत नाही. सैनिकांचे जीवन फार कष्टाचे असते. त्यांना कोणत्या परिस्थितीत दिवस काढावे लागतात, याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. अनुसया गोरे यांनी त्यांच्या ''वारस होऊ अभिमन्यूचे'' या पुस्तकात हे वर्णन केलेले आहे. आज प्रत्येक भारतीयाला ते पुस्तक वाचण्याची गरज आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!