Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Friday, October 21, 2011

ही कविता फक्त आईसाठी



ही कविता फक्त आईसाठी
अग कस सहन केल असशील
मल नऊ महिने घेउन जगण??
तुला रात्रभर जराही झोपू न देता
तुझ्या मांडीवर माझ ते रडण??

आई, आज मला तुझी खूप् आठवण येतेय
कारण आज मी सपशेल हारलोय
म्हणून परत तुझ्या त्या लढवय्या जीवनाची
स्वत:ला आठवण करुन देतोय
माझ्याकडे जे काही आहे ते फक्त
आणि फक्त तुझच आहे...
आत्मा आणि ईश्वर यांचा मेळ म्हणजे आई
हे म्हणतात ते खरच आहे....

मला अजूनही आठवतय
तू मला वीरांची गाथा सांगायचीस
आता वाटतय खरोखर
तोच तू वीर असायचीस

आई तू माझी आजिबात काळजी करु नकोस
आज पडलोय, उद्या उठीन
तूझ्या गोष्टीतल्या त्या वीरासारखा
आणि तू शिकवल्यासारखा फक्त लढीन

तू म्हणायचीस आयुष्यात आधी लढायच
असत आणि मग जिंकायच असत
तू घडविलेला , तुझा हा वीर
तुझी ही शिकवण वाया जाऊ देणार नाही...

Thursday, October 20, 2011

मैत्री विरुद्ध प्रेम

मैत्री विरुद्ध प्रेम

                        एका मुली - मुलात कधीनिखळ मैत्री का हो नसते ?




मैत्री विरुद्ध प्रेम
================
एका मुली - मुलात कधी

निखळ मैत्री का हो नसते ?

नेहमी त्यांच नात काहो

प्रेमा वरती येवून फसते ?

मैत्रिणी -मैत्रिनित गप्पा

आणि मित्रा -मित्रात मजा

मुली -मुलाच्याच मैत्रीला


प्रेमाची व्हावी सजा ?

विरुद्ध लिंगी आकर्षण

आणि खो घालतो सहवास

हळू हळू वाढते जवळीक

अन सुरु प्रेमाचा वनवास

उनाड पोरांच्या घोलक्या मधून

तो थोडा वेगला होतो

प्रेमाच्या त्या जादुपोटी

कावळ्यांमध्ये बगळा होतो

तीही नंतर दूर होते

चिव चिवनार्या सखिंपासून

त्या बिचार्या पाहत रहातात

तीच वागन आ वासून

त्या दोघांच बोलन मग

विषय विषायानी वाढत जात

मैत्री सारख पवित्र प्रेम

आकर्षणवर थांबत जात

दोघे नंतर वेगळे होतात

निरोप देतात मैत्रीला

विराम पडतो त्यान्च्याशिवाय

हास्यविनोद अन मस्तिला

मित्र फक्त मित्र बनतात

औपचारिकतेने बोलायला

सख्या फक्त सख्या रहातात

खोट्या गप्पा तोलायला

त्या घोलक्यातिल मुला मुलित

दरी पडत जाते खोल

प्रत्येकाला मिलते साथ

ढासळत जातो मैत्रीचा तोल

मैत्री मधली शुद्धता

प्रेमामुळे झिरपत जाते

प्रेम आणि मैत्रीमध्ये

मैत्री तेवढी विखारत जाते

हेवा वाटावा अशी दोस्ती

हळू हळू फ़स्त होते

फटकळ अशा प्रेमासाठी

खरी मैत्री पण स्वस्त होते

खरी मैत्री पण स्वस्त होते

पप्पा माझे लग्न करा पण

पप्पा त्याने जग नाही जिंकले तरी चालेल पण मला तरी जिंकणारा असावा .
.
पप्पा माझे लग्न करा पण ....!

पप्पा पत्रिकेचा नंतर विचार करा पण आधि H I V टेस्ट करा

पप्पा त्याचा रंग सावळा असलातरी चालेल

पण मनाने गोरा असावा...


पप्पा त्याचे केस लाल असलेतरी चालेल

पण हुंडयासाठी हाल हाल करून

जाळून पोळून भाजून मारणारा नसावा ......

पप्पा त्याच्या चेहेर्यावर डाग असलातरी चालेल

पण चरीत्र्यावर डाग नसावा .......


पप्पा त्याच्या डोक्यावर केस नसले तरी चालेल

पण त्यावर डिपार्टमेंटची एकही केस नसावी .......

पप्पा त्यानी चटणी भाकरी खालली तरी चालेल

पण व्याजाने पैसे काढून पाचपकवान खाऊ घालणारा नसावा......


पप्पा तो लेझिम खेळण्यात तरबेज असावा

पण रोज रात्री घरी येताना लेझिम खेळत येणारा नसावा ......

पप्पा तो छत्रपती शिवाजी राजे भोसलेसारखा लढवया असावा,

अशोक कामटेसरखा देशासाठी मरणारा असावा

पण एड्स सारख्या पांचट रोगाने मरणारा नसावा .....


पप्पा तो अण्णाभाऊ साठे सारखा जन जागृती

पोहाडे मानणारा असावा

पण अचाट विचाट शिव्या देणारा नसावा .....

पप्पा तो फाशी घेणारा नसावा पण भगतसिंग सारखा

देशासाठी फासावर जाणारा असावा .......


पप्पा तो संभाजी राजांसारखा वाघाचा

जबडा फाडणारा असावा पण

गुटकाची पुडी टरा टरा फाडणारा नसावा .....

पप्पा तो भावांमध्ये द्वेष करणारा नसावा,


संत रोहीदास सारखा आई वडिलांची सेवा करणारा असावा .....

पप्पा त्याने जग नाही जिंकले तरी चालेल

पण मला तरी जिंकणारा असावा .