Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Thursday, September 8, 2011

कोटेबल कोट्‌स

कोटेबल कोट्‌स
-

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
- नारायण मूर्ती

यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
- विश्‍वनाथन आनंद

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्‍य आहे.
- धीरूभाई अंबानी

पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
- जे. आर. डी. टाटा

फोटोग्राफरच्या एका "क्‍लिक'मुळे जगणे चिरकाल होते.
- रघू राय

चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.
- बिल गेट्‌स

मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता.
- कल्पना चावला

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.
- बराक ओबामा

माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
- आयझॅक न्यूटन

मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.
- सर्वपल्ली राधाकृष्णन

Monday, September 5, 2011

प्रेम म्हणजे नेमकं काय असतं



मला माझ्या मित्राने विचारले की प्रेम म्हणजे नेमकं काय असतं रे?
मी त्याला सागितले की,

कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.

...दिवाळीला स्वतःसाठी कपडे घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.

कितीही मस्ती केली रात्री लेट झाले तरी आई-बाबाना सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.

कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम.
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.

आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम.