Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Saturday, August 27, 2011

गणपतीचे गाऱ्हाणे


गणपतीचे गाऱ्हाणे
काल रात्री गणपती
स्वप्नात माझ्या आला होता
सोन्डेनेच डोळे पुसत
गाऱ्हाणे त्याचे सांगत होता
गणेश चतुर्थीचा जणू

धसका त्याने घेतला
अनंत चतुर्दशीची वाट
केंव्हा पासून पाहू लागला !!

संयोजकांना हवी
देणगीच्या नावें खंडणी
चार आण्याचा गणपती
बारा आण्याची मांडणी !!

भजन सेवेसाठी
भजनीमंडळ आले
ऐकायला ते अन मी
संयोजकही नाही थांबले !!

ऑर्केस्ट्राच्या रात्री मात्र
मला झोप आवरेना
वन्स मोअर करता करता
कोणीच आवरते घेईना !!

ऐका दाजीबा, काटा लगा
शिसारी मला आली
रुचीपालट म्हणून एकाने
लावणीची सीडी लावली !!

आधीच माझे कान मोठे
त्यात स्त्तिरिओ जोर करतोय
कानठळ्या बसून बसून मी
बहिरा व्हायचाच राहिलोय !!

बुद्धीदात्री देवता मी
सद्बुद्धी द्यायला बसलोय
तेवढे सोडून प्रत्येकजण
वेगळेच काही मागतोय !!

विसर्जनाच्या मिरवणुकीत
हाल माझे सांगवेना
स्पीकर वाजंत्रीच्या मागे
मला कुणीच पाहीना !!

उठून पळावे म्हटले तर
चौघांनी पकडून ठेवलेले
अंधार नको म्हणून
लख्ख लाईट लावलेले !!

विसर्जनाच्या दिवशी मात्र
मन माझे घाबरून गेले
पुढच्या वर्षी यायचे
आमंत्रण मला सर्वांनी दिले !!

आता मी असाच माझ्या
आईकडे जाणार आहे
नवरात्रात तिने यायचं कि नाही
विचार करायला सांगणार आहे !!

कुणाबद्दल माझी तक्रार नाही
टिळकांना मात्र मी शोधतोय
जनजागरणाची त्यांची कल्पना काय असावी
यावर सध्या विचार करतोय !!

No comments:

Post a Comment