Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Thursday, July 21, 2011

काही मजेशीर व्याख्या



काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का?

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो

सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा

वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे

लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा

फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)

ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा

लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन

छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ

कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन

परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'

परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ

विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ

दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन

थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात

काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव

नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला

घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी

मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू

ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग

विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी

विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी

श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड

श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी

IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम

IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री

बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा

स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन

चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर

लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

मिसळपाव.कॉम - जगातील सर्व 'नमुन्यांचे' एकत्रित पणे टेस्टिंग करणारी प्रयोगशाळा

परंपराचे अंधानुकरण कि दुर्लक्षित प्रथमोपचार पेटी !



दृष्टमाळ ! परंपराचे अंधानुकरण कि दुर्लक्षित प्रथमोपचार पेटी !

दृष्टमाळ म्हटले कि पटकन नजरेसमोर येतात ती सिग्नल जवळ लिंबू , मिरची आणि बिब्बा एका तारेत गुंफून विकायला येणारी मुले. आणि सिग्नल पडायच्या आत जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची केविलवाणी धडपड.! पण हि दृष्टमाळ नेमकी कशासाठी ? याचा शोध घेता घेता एक विलक्षण माहिती हातात सापडली.! खरतर हि दृष्टमाळ न्हवेच! हि आहे आपल्या पूर्वजांची प्रथमोपचार पेटी.! यातले जिन्नस पहा. पहिली मिरची दुसरे लिंबू तिसरा बिब्बा. आता याचा उपयोग जाणून घेऊया.

आपल्या शेतीप्रधान संस्कृतीत जास्तीत जास्त लोक खेड्यात राहत. उपजीविकेसाठी शेती करीत. शेती करताना अनेकदा सर्पदंश सारखे प्रकार सर्रास व्हायचे. आणि अनेक जन यात मृत्यमुखी पडायचे. विषारी सर्पाचा दंश झाला तर प्रथम माणसाच्या चव ओळखण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे विषारी सर्प चावला कि बिनविषारी हे समजण्यासाठी अश्या सर्पदंश झालेल्या माणसाला मिरची चावायला दिली जाई. ती तिखट लागली तर जीवास धोका नाही पण त्याची चव ओळखता आली नाही तर मग बाका प्रसंग! तर हा दृष्ट माळेतला पहिला जिन्नस आणि त्याचा उपयोग.

आता यातील दुसरी वस्तू म्हणजे लिंबू . पावसाआधी शेत नांगरणीसाठी तयार व्हावे यासाठी ग्रीष्मात शेतकऱ्यास बरीच अंगमेहनत करावी लागते. जमीन नीट करणे , सरपणासाठी लागणारा लाकूड फाटा फोडून घरात रचून ठेवणे, पावसाळ्यापूर्वी घराचे छप्पर नीट लावून घेणे वगैरे वगैरे. हि सर्व कामे वेळेत उरकायची म्हणजे उन्हाची तमा न बाळगता काम करावे लागे. अशा उन्हात सतत काम केल्यामुळे नाकाचा घोणा फुटून रक्त येवू लागले कि औषधी वनस्पतीबरोबर लिंबाचे पाणी देऊन पोटातील उष्णता कमी करण्यासाठी या लिंबाचा उपयोग होत असे.

आता तिसरी आणि शेवटची वस्तू म्हणजे बिब्बा. बिब्बा हि एक दुर्लक्षीत औषधी वनस्पती आहे. पोटात दुखत असेल तर दह्यात बिब्ब्याचे तेल एक ते दोन थेंब टाकून प्यायले तर पोटदुखी तत्काळ थांबते. अंगदुखी वर तिळाच्या तेलात बिब्ब्याच्या तेलाचे थोडे थेंब टाकले आणि मालिश केल्यास उपयोग होतो. पायात काटा रुतल्यास काटा काढून झाल्यावर त्याने बाधा होऊ नये म्हणून बिब्बा गरम करून त्या जागेवर चटका देतात. आजीबाईच्या बटव्यात हि बिब्बा आपले स्थान राखून आहे.

अश्या या तीन वारंवार लागणाऱ्या बहुगुणी वस्तूंना एकत्र बांधून पटकन मिळायला हवी म्हणून दारात बांधून ठेवण्याची पद्धत रूढ झाली असावी. त्यामुळे घर चालू असो व बंद हि दृष्टमाळ दारात मिळणारच. कुठल्याही घरात गेलो तरी जागा एकच. त्यामुळे शोधाशोध करावी लागू नये यासाठी घेतलेली दक्षता दिसते. अमावास्या पौर्णिमेला बदलण्याचे कारण लिंबू आणि मिरची ताजी असावी यासाठी. आहे कि नाही कमाल. पण हीच प्रथमोपचार पेटी आता दृष्टमाळ झाली. आणि अंधश्रद्धा म्हणून सरसकट सगळ्याच परंपरांना झोडपून काढणाऱ्यांच्या हिटलिस्ट वर सर्वात वरचे स्थान मिळवून बसली.


पुन्हा एकदा ती परतली..तेव्हा



पुन्हा एकदा ती परतली..तेव्हा


तिच्याविना आयुष्य जगण्यास असह्य झालं होतं,
तिच्यावाचून मन माझं सुन्न सुन्न झालं होतं..

...स्वप्नही रातीला सोडून दुर गेली होती,
झोपेलाही डोळ्यात तिचं निघून जाणं सलत होतं..

चित्त थारयावर नाही म्हणून काही सुचत नव्हतं,
तिच्या आठवणीच्या पदराभोवती माझं काळीज घोटाळत होतं…

सारं काही नरकवेदनेच्या पलीकडचं हे एकाकीपण,
अन देहात फक्त तिच्या श्वासांच जगण शिल्लक होतं..

पण… अचानक…

पुन्हा एकदा ती भेटली अशी एकांतात तेव्हा,
काळीज माझं भितीने धडधडत होतं…

पुन्हा एकदा आभासाच मृगजळ छळणार मला म्हणून,
मन माझं थरकापाने घाबरत होतं..

तेव्हा अचानक तिच्या त्या तळहातांचा स्पर्श झाला,
तसं अंग माझं रोमारोमातून शहारत होतं…

ती म्हणाली पुन्हा आली परतून मी तुझ्यासाठी,
हे सांगताना तिच्या डोळ्यातूनही थेंबांच येणं जाणं सुरूच होतं..

नाही विचारलं मी तिला कूठे होती ? का गेलीस सोडून ?
कारण तिचं येणं माझ्यासाठी एक नव्या जन्माच नवं विश्वचं होतं…

तेवढ्यात ती म्हणाली , “नाही मी राहू शकले तुझ्याशिवाय”
ते ऐकताना खरचं माझं वाट पाहण सफल ठरत होतं…

मग आली पावसाची सर धावून आमच्या भेटीला,
अन सारं काही विसरून ऎकमेकांच्या मिठीत आयुष्य पुन्हा अंकुरलं होतं…


आजी पाखडायची दलन तेव्हा चिमण्या सुपात यायच्या,
धीट होउन सा~याजनी एकेक दाणा टिपायच्या.....

अंगन आता उरलं नाही, चिमण्या सा~या उडून गेल्या,
बंद खिडक्या पाहून 'त्या' जाताजाता रडून गेल्या...
...
मला वाटतं चिमन्यानी त्यांच्यासोबत पाउस नेला,
दुष्ट पापी माणसाला तलतलुन शाप दिला....

हवा तेव्हा यावा पाउस असं कधीच घडणार नाही,
तू वाट पाहत रहा पाउस आता पडणार नाही....

बाबा सांगतात पूर्वी पाउस मुसलधार पडायचा,
नदीच्या पुरात मंदिराचा कळससुद्धा बुडायचा....

रानातलं वाहतं पाणी आता कुठं दिसत नाही,
झाड़ हिरवं नाही म्हणुन पाखरूसुद्धा बसत नाही....

खरंच सांगतो पाउस आता पूर्वीसारखा वागत नाही,
अख्खा पावसाला गेला तरी चिखल पायाला लागत नाही....!!!

सुनामी आली



एकदा काय झालं..

एक सरिता रागावली...
आपल्या boyfriend ला म्हणाली,

हे रे काय सागर!
...मीच का म्हणून?
दर वेळी मीच का?
मीच का यायचं खाली डोंगरावरून?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी..
दरी बघायची नाही..
कडा बघायचा नाही..
कशी सुसाट पळत येते मी...
विरहव्याकुळ, संगमोत्सुक..
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन..
तुझ्यात हरवून , हरपून जाईन...

आणि तू वेडा..
तुझं लक्षच नसतं कधी...
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस..
उसळतोस तिच्यासाठी..
तुझ्यासाठी पाणी आणते मी..
पण तुला भरती येते तिच्यासाठी...

मी नाही जा!
बोलणारच नाही आता..
येणारही नाही..
काठावरच्या लोकांना सांगून..
मोठं धरण बांधीन..
थांबून राहीन तिथेच..
बघच मग...

सरिताच ती.
बोलल्याप्रमाणे वागली...
सागर बिचारा तडफ़डला..
आकसला, आतल्या आत झुरत गेला..
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा..
उठला ताड..
ओरडला दहाड..
उफ़ाळला वारा पिऊन..
लाटांचं तांड्व घेऊन..
सुटला सुसाट..
सरितेच्या दिशेने...

लोक वेडे..
म्हणाले "सुनामी आली! सुनामी आली..!!"

स्टीव्ह जॉब्सच्या 'आय'ची गोष्ट




स्टीव्ह जॉब्सच्या 'आय'ची गोष्ट






इंग्रजी भाषेत 'मी' या अर्थाने जो 'आय' लिहिला जातो तो कायमच कॅपिटल लिहितात. पण एका माणसाने हा 'आय' स्मॉल लिहिला

आणि त्याचा अर्थच बदलला. पाहता पाहता हा 'आय' एक ग्लोबल ब्रॅण्ड बनला. आयफोन, आयपॅड, आयक्लाउड या त्याच्या 'आय'ने जगाची बाजारपेठ हलवून सोडली. त्या स्टीव्ह जॉब्सच्या 'आय'ची ही गोष्ट त्याच्याच सहकाऱ्याने 'द स्टीव्ह जॉब्स वे' या पुस्तकातून सांगितलीय.

पर्सनल कॉम्प्युटिंगमध्ये स्टीव्ह जॉब्स या माणसाचे कर्तृत्व जगातील कोणीही नाकारू शकत नाही. अगदी बिल गेट्सही नाही. कारण ज्या विंडोजच्या ताकदीवर आज बिल गेट्सच्या मायक्रोसॉफ्टचा डोलारा उभा आहे, त्याची मुळे स्टीव्हच्या मॅकिन्टॉशमध्ये आहेत, हे कितीही नाकारले तरी कोणालाच पटण्यासारखे नाही. त्यामुळे स्टीव्ह जॉब्स ज्याला समजून घ्यायचा आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावेजे इलियट या 'अॅपल कम्प्युटर'च्या उपाध्यक्षांनी हे पुस्तक लिहिलेय. त्यामुळे 'अॅपल'चा सवेर्सर्वा असलेल्या स्टीव्हला त्याने जेवढे जवळून पाहिलेय, तेवढे क्वचितच इतर कोणी पाहिले असेल. इलियट यांचे हे जवळ असणे कधीकधी खूप काही आतले सांगून जाते तर कधीकधी काहीतरी राहिलंय असा आभास निर्माण करते.

स्टीव्ह हा काही व्यावसायिक उद्योगपती नाही. तो एक वेडा माणूस आहे. कॉलेज सोडलेला... त्यातच कॅलिग्राफी शिकलेला... गॅरेजमध्ये मित्रासोबत अॅपलची स्थापना करणारा... त्याची पॅशन हेच त्याचे भांडवल आणि काहीही करायची तयारी ही त्याची गुंतवणूक. एवढ्याच ताकदीवर या माणसाने तंत्रज्ञानाच्या जगात साम्राज्य उभे केले. पण त्याचा मार्ग इतरांपेक्षा वेगळा होता. तो मार्ग या पुस्तकातून सापडत जातो.

एका परिच्छेदात स्टीव्हच्या कामाच्या पद्धतीचे वर्णन करताना इलियट सांगतात, की त्याने कधीही इतर काय करतात यावर आपला रस्ता आखला नाही. आपले प्रोडक्ट हे अद्ययावत असले पाहिजे, पण ते किचकट असता कामा नये. आपले प्रोडक्ट अधिकाधिक लोकांना सहजपणे वापरता आले पाहिजे. कोणत्याही प्रोडक्टपेक्षा ते वापरणारा युजर अधिक महत्त्वाचा. जर एका युजरला ते सोपे आणि उपयुक्त वाटले की त्याची प्रसिद्धी करायची गरजच नाही. ते आपोआप अन्य लोकांपर्यंत पोहचेल, हा स्टीव्हचा विश्वास होता.

याच पद्धतीने स्टीव्हने आपली सर्व प्रोडक्ट बाजारात आणली. मग ते मॅकेन्टॉश असो की आत्ताचे आयक्लाउड. पण या प्रवासात त्याने जे काही पाहिलेय ते फार कमी लोकांच्या वाट्याला आलेय. एकीकडे आपल्याच कंपनीतून हाकलले जाण्याची मानहानी तर दुसरीकडे जीवघेण्या आजारामुळे अक्षरश: मरणाच्या दारातून त्याचे परत येणे या दोन्ही गोष्टी स्टीव्हची विजिगीषू वृत्ती अधोरेखित करतात.

या प्रत्येक संकटाच्या वेळी स्टीव्हने ज्या पद्धतीने मार्ग काढला ती विचार करण्याची पद्धत प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. ज्या गोष्टीवर माझे प्रेम आहे ती गोष्ट करण्यासाठी वेडे होता आले पाहिजे, मग भले त्यामध्ये काहीही आड आले तरी ते पार करता येते हे स्टीव्हने नुसते सांगितले नाही, तर जगून दाखवले. 'नेक्स्ट' आणि 'पिक्सार' या कंपन्यांची स्थापना हीच तर गोष्ट सांगते. कर्करोगामुळे फार तर सहा महिने जगू शकेल असे डॉक्टरांनी सांगितल्यावर स्टीव्ह प्रत्येक दिवस शेवटचा म्हणून जगला. सुदैवाने ऑॅपरेशन यशस्वी झाले आणि तो बरा झाला हा फक्त चमत्कार नव्हता तर स्टीव्हमधील 'आय'चा विजय होता. एवढ्या जीवघेण्या संकटातून उभे राहिल्यानंतरही तो थांबला नाही. त्याने पुन्हा एकदा अॅपलला मोठे करण्याचा संकल्प घेतला आणि आज ते वास्तवात येतेय.

स्टीव्ह जॉब्सच्या या यशोगाथेतून आपल्याला काय घेता येईल हे देखिल इलियट 'ऑॅन हीज फूटस्टेप्स' या शेवटच्या भागातून सांगतात. त्यांनी न लिहिलेला पण पुस्तकभर जाणवत राहणारा मुद्दा म्हणजे, स्टीव्हच्या या मार्गावरून चालण्यासाठी आपल्यालाही आपला 'आय' स्मॉल करावा लागेल!

बुद्धिबळाचा खेळ संपला कि



बुद्धिबळाचा खेळ संपला कि राजा आणि शिपाई पुन्हा एकाच डब्यात बंद होतात
माझ्यामुळे हे सर्व काही आहे.

मी नसतो/नसते तर तुमचे हाल कुत्र्याने सुद्धा खाले नसते

मरावे परी कीर्ती रूपी उरावे

एक ना दोन काय काय वक्तव्य असतात एकेकाची

पण

...

मेल्यावर सर्व काही समान, एकाच माळेचे मणी होऊन जातात

हे आपण सोईस्कर पणे विसरून जातो

बुद्धिबळाचा खेळ संपला कि राजा आणि शिपाई पुन्हा एकाच डब्यात Linkबंद होतात

Tuesday, July 19, 2011

शेवटची भेट....!!!



शेवटची भेट....!!!
रस्ता ओलांडताना अचानक
ओळखीचा चेहरा दिसला
अन पहिल्या प्रेमाची
आठवण देऊन गेला!१!

वाटलं द्यावी हाक
पण स्वताला आवरलं
कारण तुझ्या हाताला
लहानशा मुलानं धरलेलं!२!

आठवली शेवटची भेट
जेव्हा आपण भेटलेलो,
अन कॉलेजमध्ये झालेल्या प्रेमाची
शेवटी सांगता करायला आलेलो!३!

सतत बडबडणारी तू
त्या दिवशी शांत होती
डोळ्यात मात्र तुझ्या
खोल आसवं दाटलेली होती!४!

मी असाही अबोल,
माझीतर वाचाच गेली होती
आता वेगळ व्हायचं म्हणून
पायाखालची जमीनच सरकली होती!५!

मी दिलेला हिरवा ड्रेस
तू परिधान केला होता,
मी मात्र, तू दिलेला शर्ट
कपाटात जपून ठेवला होता!६!

शेवटच तुला डोळे
मनात साठवत होते,
तुझे डोळे मात्र मला
भिडण्यास काचरत होते!७!

न राहवून शेवटी हाथात
माझ्या लग्न-पत्रिका दिली
अन माझ आभाळच फाटल्याची
तेव्हा मला जाणीव झाली!८!

मी निघते,
म्हणून तू पाठमोरी झाली
अन तुझ्या पाठीवर काठीचे व्रण
असल्याची मला धूसर जाणीव झाली!९!

प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं...



प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं...
प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं,
पाखरू बनून उंच उंच
तिला घेवून उडायलाच हवं...

तिच्या हस-या चेह-यावर जावू नका
अंतर्मनात जावून दुःख
एकदा तरी बघायलाच हवं,
अगदी मरण यातना सोसून
तिचा श्वास होवून जगायलाच हवं...

आयुष्याचा श्वास आहे ती
म्हणुन आयुष्य अजुन टिकून आहे,
तिलाही खुप त्रास होत असेल
केवळ तुम्हाला त्रास नको म्हणुन
ती हातचं काही राखून आहे...

असं प्रेम मिळणं हा
नशिबाचा एक भाग आहे,
ते मिळवण्यासाठी थोडं धडपडायलाच हवं,
त्यासाठी प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं...

काय असत प्रेमात .....



काय असत प्रेमात .....? कसली असती हुरहूर...?


कशी असती काळजातली धडधड....? काय मज्जा असते चोरून चोरून भेटण्यात...?
कस वाटत तेच तेच फोनवर तासनतास बोलायला....?
काहीच माहिती नव्हत.....

चला एकदा '' TRY '' घ्यावा म्हणून प्रेमात पडायचं ठरवलं....
खोट - खोटच पण तरीही त्यात शिरायचं ठरवलं....
मित्रांना फुगवून सांगायचं.....
माझी '' GIRLFRIEND '' अशी आहे..... तशीच आहे....

आणि एकदाचा तिच्या प्रेमात पडलो.....
तिला याची काहीच कल्पना नव्हती...!

आणि मी तसाच विचार करायला लागलो......
हुरहूर.......धडधड.....
जे काय असत ते सगळ मिळाल.....!!
मित्रांना फुगवून सांगितलं .....
माझी '' GIRLFRIEND '' अशी आहे..... तशीच आहे....

पण...अचानक दोन - चार दिवस ती मला भेटलीच नाही....
आणि मग माझी मनात कालवाकालव व्हायला सुरु झाली ..
अरे.. हे सगळ खोट -खोट होत मग अस का होतंय.....

मी खोट - खोट म्हणता म्हणता .....
खरच प्रेमात पडलो....अगदी मनापासून ......!!

घरामध्ये बसू वाटत नव्हत......
ऑफिस मध्ये काम करू वाटत नव्हत.....
सतत तिचाच विचार.....
प्रत्येक ठिकाणी तिचाच चेहरा दिसायचा....!

एकट एकट राहू लागलो.....
शांत शांत ....गुमसुम राहू लागलो .....
'' दोस्तो कि दोस्ती,यारो कि यारी कम लगने लगी ''
हे सुद्धा खर झाल...!!

तिला तर काहीच सांगितलं नव्हत....
इकडे माझ्याच मनाचा गोंधळ चालला होता.....
तिला सांगाव म्हणून मी एका संधीची वाट पाहू लागलो......
आणि एक दिवशी तिच स्वतःहून माझ्याकडे आली...!

अरे वा......!
मी संधीला शोधण्यापेक्षा संधीच माझ्याकडे आली होती...!!
मी जाम खुश झालो......
ती आलीच.....पण.....
येताना ती तिच्या '' प्रेमाला '' घेवून आली....
खास माझ्या भेटीसाठी......

जखमेवर मीठ चोळतात तसच काहीतरी माझ झाल.....
पण तिला तरी काय दोष देणार..... तिला तरी हे काहीच माहिती नव्हत....
आणि आमच्या प्रेमाची कळी खुलण्याआधीच सुकून गेली....
आणि अस म्हणतात कि ......
'' जब दिल तुटता हैं तो उसकी आवाज नही आती....''
मी तो आवाज ऐकला......
अगदी खरा खरा.........

अजुन काय हवे



एकच चहा, तो पण कटिंग.....
एकच पिक्चर, तो पण tax फ़्रि....
एकच साद, ती पण मनापासुन...
अजुन काय हवे असते मित्राकडून?

एकच कटाक्ष, तो पण हळुच....
एकच होकार, तो पण लाजुन...
एकच स्पर्श, तो पण थरथरुन....
अजुन काय हवे असते प्रियेकडुन?

एकच भुताची गोष्ट, ती पण रंगवून.....
एकच श्रीखंडाची वडी, ति पण अर्धी तोडुन....
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासदुन....
अजुन काय हवे असते आजीकडुन?

एकच मायेची थाप, ती पण कुरवाळुन....
एकच गरम पोळी, ती पण तुप लावुन....
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणुन....
अजुन काय हवे असते आईकडून?

एकच कथोर नकार स्वेराचाराला, तो पण ह्दयावर दगड थेउन.....
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोगरया आवाजातून....
एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहुन.....
अजुन कय हवे असते वडिलाकडुन?

सगळ्यानी खुप दिले, ते पण न मागून....
स्वर्गच जणू मला मिळाला, तो पण न मरुन....
फ़ाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन...
अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडुन.

मुंबई मुंबई मुंबई...............



मुंबई मुंबई मुंबई...............
मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय
८ रूपयाला वडापाव आणि १० रु ला चाय
आला पाहुना घरी तर आखडून बसायच पाय
आणायची ९० रु किलोची चिकन सांगायच बोकडाच मिळतच नाय
अहो पगार कमी सांगुन इज्जत गमवायची नाय
मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय ...........
सकाली सकाली ९ वाजता उठायच
बिना तोंड धुता खिडकित यायच
शेजारच्या पोरीला शाळेत जाताना
हळूच म्हणायच हाय
तीने रागात पाहिल तर
म्हनायच सुंदर माझी ताय
मनातल्या मनात एक शिवी घालून बोलायच रोंग़ नंबर लागला की काय
अहो मुंबई मुंबई मुंबई तित आहे तरी काय
रिक्षाची भीड़ , गल्ली बोलातल रस्त
बाइक वाल्यांची किर किर
फेरीवाल्यांची दादागिरी
सड्लेली कोथिम्बिर
कच्च कुच्च वडापाव
आणि लघु शंका असलेली पानी पूरी खाऊन
पर प्रान्तियानाच म्हनाय्च भाय
अहो मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय
पान्या साठी पलायच , ग्याससाठी रांगा
कामाला जान्या अगोदरच
फैक्ट्री चा वाजतो भोंगा
धावत धावत टाकाव्या लागतात
ट्रेन मधे ढेंगा
ट्रेन मधल्या गर्दित
आपण असतो आत मधे
आणि बाहेरच लटकतात पाय
दादा मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय
काही ही असुद्यात
पण करोडो कुटुम्बाची पोशिंदा ती
तीच आमची ताय आणि तीच आमची माय
आमच्या मुंबई चा आम्हाला आभिमान हाय
आहो मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय
गरिबाच पोट आणि दुधावरली साय

Monday, July 18, 2011

मोबाईल



चार मिञ एकञ बसुन दारु पित असतात. अचानक समोर ठेवलेल्या फोनपैकी एकाचा फोन वाजतो. एक जण फोन उचलतो. डार्लिँग, मी शॉपिंगला आलेय. एक ५०००० हजाराचा सोन्याचा हार घेउ? घे की विचारायच काय त्यात? तुझं क्रेडिट कार्ड वापरु? वापर की. ...फोन ठेवल्यावर बाकिचे मिञ: अरे तुला चढली काय? काय मुर्खपणा करत होतास फोनवर? फोन घेणारा (शांतपणे) :ते जाउदे. हा मोबाईल तूमच्यापैक कुणाचा आहे ते सांगा

स्त्री आणि दारू




स्त्री आणि दारू

जेंव्हा स्त्री आयुष्यात येते तेंव्हा जिवन सुंदर बनते

निघून जाते जिवनातून तेंव्हा मग दारूच सोबत देते.

रोज नवनविन स्वप्न रंगवली हि जातात

दारूच्या पेल्या मध्ये मग ती दिसू लागतात.

आनंदाच्याक्षणी मात्र सोबत स्त्रीची असते

दुख: विसरायला मात्र दारूच कामी येते.

म्हणे स्त्रीची सोबत पुरुषाला मरेपर्येंत आसते

मग जिवंतपणी पुरुषाला दारूची ओढ का लागते.

पुरुषावर स्त्रीपेक्षा दारूचे प्रेम जास्त असते

ती सोडून जात नाही तिला सोडावी लागते.

Sunday, July 17, 2011

जनरेशन गॅप

जनरेशन गॅपचं एक ठळक उदाहरण

आमिर खान :
पापा केहते है, बडा नाम करेगा
बेटा हमारा ऐसा काम करेगा



इम्रान खान:
डॅडी मुझसे बोला, तू गलती है मेरी
तुझपे जिंदगानी गिल्टी है मेरी