Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Saturday, October 15, 2011

तू सोबत हवा.......


तू सोबत हवा.......

माझी नजर तू स्वप्न,
माझ्या डोळ्यात तू ,
चमकायला हवा !
माझा रंग, तुझ्या छटा,
माझ प्रेम, माझी माया,
त्यावरही असतेच ना,
तुझीच छाया !
माझे पंख, माझा थवा,
त्यांना बळ द्यायला,
तू साथीला हवा !
माझे आकाश, माझे क्षितिज,
यांच्या पुढे न्यायला,
तू सोबत हवा !!

आयला, आता आमची सटकली रे .................


आयला, आता आमची सटकली रे .................
म्हणे ३२ रुपयामध्ये घर चालवणारा श्रीमंत.............
काय म्हणावे या आयोगाला ? भाजी घेतली दोन किलो वांगे , आणि पाव शेर कांदे .........
तिकडे भाजीवाला म्हणतोय आयकर विभागाने मांगीतले प्यान नंबर .............
झाले का आता वांदे ? आता एक वेळची आहे खायची भ्रांत...........
आणि अश्या वेळी सरकार म्हणते इश्यू करू नका बसा शांत .............
आयला, आता आमची सटकली रे .............
आयला, आता आमची सटकली रे .............
तुटपुंज्या पगारावर चालवायचे कसे घर ........
दिवस रात्र आम्हाला याची खंत ............
सरकार म्हणते चार पैशे इकडे तिकडे करायचे ..............
करावी कशाला फालतू चिंता. जिकडे बघावे तिकडे भ्रष्टाचार ............
किती काळ सांबाळून चालणार आहे आमचा सदाचार .......
सरकारने जगणे मुश्कील केले आहे ........
लावली आहे आम्हा गरीबाची ग्यास, वीज सगळेच महाग करून ठेवले आणि लावली आमच्या जीवनाची वाट ............
आता काय बोलायचे ............
सरकारने लाज, शरम, हया सर्वच सोडलेय ........
आयला, आता आमची सटकली रे ..........
आयला, आता आमची सटकली रे ..........
हे असले जीवन जगताना माणसे निराशेला टेकलेत ...........
आणि सरकार मात्र " जनता कि भलाई " के लिये म्हणून स्वताचे पोट भरून डेकार घेवून राहले..............
जिकडे बघावे तिकडे नुसता पैसा खातात ...........
सरकारला काय लेणे देणे लोक जगतात कि मरतात............
आयला, आता आमची सटकली रे ..........
" ज्याची जळते त्यालाच कळते " म्हणूनच " आयला , माझी जाम सटकते" भडव्या, नेत्यांनो, स्विस ब्यांकेत अरबो चोरीचे पैसे ठेवता आणि ३२ रुपयामध्ये
आमचे घर चालते तुम्ही आम्हाला शिकवता. साल्यानो, एक दिवस ३२ रुपयामध्ये काढून दाखवा .................... "
आजन्म तुमची गुलामी करत राहील भडवे लोकांनो "गरीबाची काय हि थट्टा लावली आहे पांढरपेश्या गुंड लोकांनो ........... "
चोर पे मोर " बनून आमच्या मेह्नितीच्या पैश्यावर बंगले बांधता साल्यानो ........
आयला, आता प्रत्येकाची सटकली पाहिजे आणि ................
भारतामध्ये करोडो सिंघम बनून या चोराचा नायनाट केला पाहिजे ............
आयला, आता आमची सटकली रे .................
" तुमची सटकली कि नाही मित्रानो ???

Monday, October 10, 2011

आई न घरी न दारी



आईला मारून तिचे काळीज आपल्या प्रेयसीला द्यायला धावत निघालेल्या मुलाची कथा सानेगुरुजीना सुचली.ठेच लागून खाली पडलेल्या मुलाला आईच्या काळजाने "बाळ, लागले का रे तुला?"असे काळजीने विचारलेले गुरुजीनी ऐकले.कवी यशवंतानी तिन्ही जगाचा स्वामी आईविना भिकारी आहे, असे सांगून कित्येकान्च्या डोळ्याला पाणी आणले.या आईचे महात्म्य किती किती प्रकारानी जगभरच्या माणसानी गावे हो?विंदा करंदीकर यानी तर सत्ययुगाच्या अखेरची एक गोष्टच कवितेत आणली.ते म्हणाले" सत्ययुगाच्या अखेरीस प्रेम आणि द्वेष यांच्यात लढाई झाली.द्वेष विजयी झाला आणि प्रेम आईच्या हृदयी लपून बसले."आई आपल्या मैत्रिणीच्या मुलालाही अंगावर पाजते.मैत्रिणीला पान्हा फुटत नाही म्हणून!राजस्थानच्या विष्णोई जमातीचे साऱ्या चराचर सृष्टीवर प्रेम.आईविना पोरक्या झालेल्या तान्ह्या हरीणपाडसाला स्तनपान देणारी विष्णोई माता मी फोटोत पाहिली.मूल घाबरले की 'बाप रे!'असे म्हणते.वेदनानी कासावीस झाले की 'आई !' म्हणते.बाप कथित असतो.आई एक तथ्य असते.Mother is a fact. Father is a fiction.शुक्रपेशी फलित झाली की बापाचा सम्बन्ध संपला,असे एका कथालेखकाने म्हटले आहे.गे आई,थोर तुझे उपकार!
यशवंतांच्या नंतर मराठीतील आई कुठे गेली?असा प्रश्न कुसुमाग्रजाना पडला.मलाही वाटू लागते की कुठे जाते ही आई काही काही वेळा?सांगली महापालिकेने नुकताच झोपड़पट्टी हटाव कार्यक्रम घाव घालत राबवला.झोपड्या उडवून लावल्या. सामान रस्त्यावर फेकले.झोपडी उध्वस्त!संतप्त! शिव्या,दगडफेक हे समजता येते.पण एका मातेने काय करावे?तिनेआपले दोन वर्षांचे मूल कडेवरून उचलले आणि दाणदिशी दगडावर आपटले.मुलाने डोळे फिरवले .बेशुद्ध झाले.रक्ताने भिजले.सुरक्षा दलातल्या दोन तरुण स्त्रिया पुढे आल्या मुलाला उचलले.औषधपाणी केले.त्या पोलिस बाईनी तान्ह्याला उचलले.सख्ख्या आईने आपटले.मुलाची ती आई तेव्हा कुठे गेली असेल हो?प्रश्न आपण जिवंत राहण्याचा असेल तर माणसाना कठोर व्हावे लागते हे मला ठावूक आहे. कित्येक वन्य जमाती अन्नाला महाग झाल्या,वैराण वाळवंटी वा बर्फमय प्रदेशातून कित्येक महिने हाय हाय करीत जावे लागणार म्हटले की म्हातारी माणसे बिनदिक्कत मारून टाकावी लागतात ,हे मी वाचलेआहे.पण आजच पेपरात मी वाचले की आईचे बापाशी नाते तुटले आणि कुठे तरी नवीन जमले.आई मग उठली.मोका साधला.आठ वर्षांच्या आपल्याच मुलीचे नाक आणि तोंड दाबून धरले.भल्या पहाटेच्या अंधारात ती आई लेकीचे प्रेत कुठेतरी फेकायला निघाली.लोकांना दिसली आणि फसली.
सानेगुरूजी या आईला काय म्हणणार?त्याना कधी ही आई दिसलीच नव्हती.माकडीण नाकातोंडात पाणी जाऊ लागले की पिल्लाला आपल्या पायाखाली घेते. ही माणसाने लिहिलेली कथा आहे.पण परवाच डिस्कव्हरी वाहिनीवर पाहिले की मरून पडलेल्या आपल्या पिल्लाजवल माकडमाता शोकाने जाते.त्याला नाना प्रकारे तपासते.परिवाराला बोलावते .सर्वजण येतात. पिल्लाची बारीक पाहणी करतात.माता मग ज़रा दूर जाते.डोळे पंजाने पुसत राहते.दुष्काळ पडणार.खायला कमी असणार .लेकरानी जगावे म्हणून वानरी झाडाच्या ढोलीत ,धान्य आणि फळजाती चावून चावून बनवलेले लाडू ठेवते आणि मग नरमादी दोघेही लाकडाच्या खोडावर प्राण सोडतात.मारुती चितमपल्ली यानीच हे लिहिलय!माणसाची मादी मग काही वेळा आपल्याच पिलांचा प्राण का घेते?तिचे स्तन्य पार आटून का जाते?
मला सरोगेट आईबद्दल आज तरी काही म्हणायचे नाही.पण सरेंडर -Surrender-आईचे मात्र काही कळत नाहीसे होते आहे.चार दोन वर्षांच्या कराराने तरुण तरुणी एकत्र येऊ पाहत आहेत.ती नर आणि मादी म्हणून राहतात.बाप आणि आई म्हणून नाही.सोविएत रशियाचा मार्ग ठीक होता.मुले सरकारने आपले धन म्हणून वाढ करायला न्यावीत.पुढे श्रमिक शक्ति हाताशी येते.आता गर्भाशय जिथे विकायला बाजारात येते,तिथे मूल ही क्रयवस्तू बनणार हे निश्चित!पण बैंड लावून ,भटजी बोलावून ,पंक्ती उठवून ,मंगलाष्टक म्हणून ,अग्निसाक्ष विवाह होतात.मधुचंद्र धुंद होतो.ट्याहा होते.आजोबा आजी डोळ्यातून निरांजने दाखवतात.पुढे रान सुकते.विवाहाला तडा जातो. मग भटजी जोड़ी बदलून मंत्राला आणतात.सप्तपदी पुन्हा एकदा साता जन्मांची आण घेऊन येते.आधीचे मूल मात्र कोठेतरी लांब भेदरून,गुदमरून उभे राहते.बन्सीधराला आई मिळते तर बाप परागंदा होतो.बाप जवळ तर आई नव्या संसाराला लागलेली.बन्सीधराने आता कोठे जावे?श्री..माटे यानी लिहिलेली कथा आठवत राहते.परवा दोन डोहाळजेवणप्रकार पहायला मिळाले.कुठे बारशांचे थाट उडालेले ऐकले.अंगाई गीते म्हटली गेली."कित्ती क्यूट आहे बाळ!"म्हणून कौतुक करीत पोक्त मंडळी गोड तोंडाने घरी परतली.पहिल्या लग्नाची मुले भेदरल्या ,हरवल्या डोळ्यानी कुठेतरी एकाकी जगत होती.त्याना आता कोण जवळ घेणार?आईची माया त्याना कुठून मिळणार? मला खरच प्रश्न पडतो .पहिली आई दुसरे आईपण भोगायला बोहल्यावर चढते.डोहाळ जेवण उखाणे घेऊन सजवते.जुनी आई नव्या बापाला घेऊन नव्या संसारात नव्या मुलाच्या कौतुकाला लागते ,तेव्हा तिला पहिल्या मुलाची एवढीतरी आठवण येत असेल का?मला बापाबद्दल काही प्रश्न विचारायचे नाहीतच.शुक्रबीजाच्या फलनापासून त्याचा सम्बंधच तुटलेला असतो.पण आईचे काय? एका मुला-मुलीची आई नव्या गर्भाधानाची नवलाई मिरवत राहते,तेव्हा तिच्या आधीच्या लेकराच्या डोळ्यातले आसू काही म्हणजे काहीसुद्धा तिला दिसत नसतील का?
घटस्फोट कोर्टात सहीशिक्क्यानी पक्के होतात.पोटगी म्हणून बाईला रक्कम मिळते.मुलाच्या शिक्षणासाठी,पोषणखर्च म्हणूनसुद्धा पैसे मागितले जातात."मरू दे तिकडे ब्याद" म्हणून पैसे फेकले जातात.पण परित्यक्त आईनेच दुसरा घरोबा केला तर मुलाला कोण शिकवणार?कोण त्याला ठेवून घेणार?आजोबा आणि आजीच वृद्धाश्रमात गेले तर?
माझ्या दारी सकाळच्या कोवळ्या उन्हात एक गोड चेहरा असणारा गुबगुबीत मुलगा काखेला रामदासी झोळी लावून 'जय जय रघुवीर समर्थ'पुकारत आला.मुलगा वात्सल्य जागे करणारा होता.चेहरा कोमल ,बालसुलभ भाव सांगणारा.नरसोबावाडीतून आलो म्हणाला.तेथेही कुठूनतरी आलेला.आईबाप आठवायचे.देवाच्या हवाली केले म्हणाला.वाडीला ओवरीत राहतो ,भिक्षा मागतो.अन्न छत्रात जेवतो.लोक कपडे देतात.मला हुंदका फुटला.मुलगा मात्र स्थिर चेहरा घेऊन उभा.त्याला खाऊ घातले.नवे धोतर दिले.पैसे दिले.पुन्हा ये म्हटले.मुलगा 'जय जय रघुवीर

...