Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Saturday, September 24, 2011

बाप म्हणजे



बाप म्हणजे
वसुंधरेच्या गर्भाला पडलेल एक सुंदर स्वप्न
हिरेमाणकांपेक्षाही श्रेष्ठ अस सृष्टीच रत्न

बाप म्हणजे
दयेचा सागर, करुणेचा पाझर
संसाररूपी यद्न्यातील धगधगता एक जागर

बाप म्हणजे
आईच्या कपाळाची शान
घरात उभ्या तरण्याताठ्या मुलीची जान
विवाहाच्या मंगलप्रसंगी कन्यादानाचा प्राण

बाप म्हणजे
माहेर सोडून जातांना ऊर उसवून रडणार्‍या
पोरीसाठी आठवणीचा धागा
ढळत नाही मळत नाही
काही केल्या कमी होत नाही त्याची पोरांवरची माया

बाप म्हणजे
हिमालयाची सावली, पंढरीची माऊली
ईश्वराच्या अस्‍तित्वाची खरीखुरी कहाणी
बाप असतो घराच सामर्थ्य
अन् असतो कवच कुण्डल ही
संकट येतात
बापाच्या छाताडावर नाचून जातात
निर्दयी होऊन त्याच काळीज सोलतात
बाप ब्र न काढता हे सोसत असतो
तेंव्हा कुठे सगळे खुशाल असते

आई सर्वांना कळते
पण बाप कुणालाच कळत नाही
कर्तव्यात तोही कधी चळत नाही
कंठ दाटून आला तरी साधी आसवेसुद्धा गाळत नाही
बाप जितका सहज असतो
तितकाच गहन असतो
प्रेमापोटीच रागाची एक झूळुक असतो
कधी जहाल असतो
कधी मवाळ असतो
माया अन् ममतेने
ओथम्बलेली ओन्झळ असतो
बाप कधी व्यक्त असतो तर कधी अव्यक्त असतो
कळणार नाही इतका महान असतो

खरच बाप महान असतो

No comments:

Post a Comment