Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Saturday, July 16, 2011



औफिसमध्ये साहेबांच्या निरोपसमारंभ ... लिनाबाई समारंभाचं भाष्ण करायला आल्या....
"साहेबांच्या हाताखाली काम करता करता दिवस कसे गेले ते कळलंच नाही"
.... आणि सभाग्रहात जोरदार हशा ...!
******************************

रमबाईंचे नव-यावर अतिशय प्रेम होते. त्यांचा नवरा वारला ...
"रमबाई आता नव-याशिवाय काही जगु शकत नाहीत", असे सर्वजण म्हणु लागले, आणि ते खरंही झाले.
त्यांनी आठवडाभरात दुसरं लग्न केलं ..!

************************************************************
तुम्ही दारु पिता का?
.... हा प्रश्न आहे की आमंत्रण ..?

************************************************************
"हा शर्ट किमती दिसतोय?"
"तो माझा नाही !"
"पॅन्ट पण छान आहे ..!"
"तीही माझी नाही ..!!"
"मग तुझे काय आहे..?"
"लौन्ड्री ...!!!"

************************************************************
पोलिस - दारुड्यासः ईथे का उभा आहेस?
दारुड्या - तोल सांभाळीतः यावेळी सारे शहर माझ्याभोवती फीरत आहे. माझे घर आले की मी घरात घुसेन ..!

************************************************************
पोलिस - अपघात झालेल्या बाईसः बाई, आपणास धडक देऊन गेलेल्या मोटारीचा नंबर आपण पाहिलात का?
बाई: नंबर काही लक्षात नाही माझ्या... पण मोटार चालवणा-या त्या बाईने हिरव्या रंगाची साडी नेसली होती, गळ्यात मोत्याची माळ होती..आणि ... तिचं लिपस्टिक मात्र तिला मुळीच शोभुन दिसत नव्हतं ..!

************************************************************
पहिला: का रे..? बराच आनंदी दिसतोय? आणि कपडे का असे खराब झालेत?
दुसरा: बायकोला माहेरी पाठवायला रेल्वे - स्टेशनवर गेलो होतो...
पहिला: अरे हो.. पण कपडे का असे खराब झालेत?
दुसरा: गाडी लवकर सोडावी म्हणुन इंजिन ड्राईव्हरला कडकडुन मिठी मारली ..!

************************************************************
पहिला: लोकांनी उगाचच त्या माधुरी दिक्षीतला डोक्यावर बसवुन ठेवलंय. तिचा रंग, थोडासा अभिनय, जरा नाक-डोळे सोडले तर उरते काय?
दुसरा: माझी बायको!

************************************************************
तुफान पाऊस पडतोय..
तुला वाटत असेल, छान बाहेर पडावं...
भिजुन चिंब होत, पाणी उडवत, गाणं गाताना...
कुणीतरी खास भेटावं ...!
हो ना?


... अरे हो म्हण ना..! लाजायचं काय त्यात..?
प्रत्येक बेडकाला असंच वाटत पावसांत...!

************************************************************
नकार देणे ही कला असेल. पण, होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे .

************************************************************

तू झाडावर चढू शकतोस का ? संजीवनी आणू शकतोस का ? छाती फाडून राम - सीता दाखवू शकतोस का ? नाही ना ? ॥
अरे वेड्या, फक्त माकडासारखं तोंड असल्यानं कुणी हनुमान होत नाही !!!!

************************************************************

आपली चूक असताना जो माफी मागतो, तो प्रामाणिक असतो.
आपली चूक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो.
आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो !!!

************************************************************

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात. तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो. एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो... .. का?
.. अंगात मस्ती, दुसरं काय?

************************************************************

जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते, असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का? जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!

************************************************************

हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं!!!

************************************************************

अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता , हे समजल्यावर त्याची आई संतापलीच. त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं विचारलं, '' तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना, जे तू पाहायला नको होतं?'' त्यानं उत्तर दिलं, '' पाहिलं. '' कानावर हात ठेवून तिनं विचारलं, '' काय पाहिलंस?''

'' आपले बाबा !!!! ''

************************************************************

तो फार सज्जन माणूस होता.
त्याने कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.
त्याने आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.
त्याने परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही...
... तो मरण पावला, तेव्हा इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला...
... ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!'


=============================


' हॅप्पिली मॅरीड मॅन'!!!
लग्नाआधी... सुपरमॅन
लग्नानंतर... जंटलमन
लग्नानंतर १० वर्षांनी.. वॉचमन
लग्नानंतर २० वर्षांनी... आपल्याच जाळ्यात फसलेला स्पायडरमॅन!!!


================================================


काय गंमत असते पाहा...
देवळात दक्षिणेची पेटी समोर आली की १०० रुपये किती जास्त वाटतात... ... मॅकडॉनल्डमध्ये
मात्र तेच किती कमी वाटतात!!!


==============================================


एका ओंडक्यावर पाच बेडूक बसले होते.
त्यातल्या चौघांनी पाण्यात उडी घ्यायचं ठरवलं.
मग ओंडक्यावर किती बेडूक उरले?
....

पाच.
कसे काय?
अहो, काहीतरी ठरवणं आणि खरोखरीच तसं करणं यात फरक असतो!!!!


==============================================

दक्षिण भारतीय मंडळी वर्णाने काळी का असतात?
कारण ती सनस्क्रीन न लावता सदोदित सन टीव्ही, सूर्या टीव्ही, उदय टीव्ही पाहात असतात
!!!!


=============================================


नेहमीच्याच बारमध्ये नेहमीच्याच मेंबरांची सपत्नीक पाटीर् ऐन रंगात आली होती. रामरावांसकट
सगळ्यांनी दोन दोन क्वार्टर रिचवल्या होत्या. अचानक रामराव चित्कारले, ''मित्रहो,
आपल्यापैकी जे विवाहित असतील, त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी उठावं आणि ज्या
व्यक्तीमुळे त्यांच्या आयुष्याला अर्थ लाभला, ज्या व्यक्तीमुळे त्यांचं आयुष्य सुखाचं झालं, त्या
व्यक्तीच्या शेजारी जाऊन उभं राहावं....''


??????


क्षणार्धात रोज दारू र्सव्ह करणाऱ्या बगाराम वेटरशेजारी अशी काही झुंबड उडाली म्हणता!!!!
*****************************************************************************


नयन घरी आल्यावर बघतो की त्याची बायको नयना गणपतीच्या तयारी साठी घराला रंग देत आहे व तिने दोन कोट घातले आहेत.
नयन तिला विचारतो कि तिने अस का केलं.
नयना : मी रंग देण्यापूर्वी रंगाच्या डब्यावरिल सुचना काळजी पूर्वक वाचल्या आहेत. डब्यावर लिहील आहे चांगल्या ईफेक्ट साठी दोन कोट घाला.

------------------------------


मदन थकुन घरी आला. सोफ्यावर बॅग फेकली आणि तिथेच आडवा झाला.
मनिषा त्याच्यासाठी पाणी घेऊन गेली. बघते तर काय मदन घोरायला पण लागला होता.
"अहो, काय झालं ?"
"अहो, काय झालं तुम्हाला"
मदन : अSSS..., काही नाही गं. आज ऑफिस मधले सगळे कॉंप्युटर बंद पडल्यामूळे आम्हाला डोकं चालवायला लागलं, त्यामुळे थकून गेलो.

---------------------------------------------------------

दोघे मित्र संजय व विजय जेवायला हॉटेलमध्ये जेवायला जातात. जेवायला दोन मासे सांगतात. वेटर दोन मासे आणतो पण त्यातला एक लहान व एक मोठा असतो.
संजय : अरे घेना तु त्यातला एक.
विजय : नाही तुच अगोदर घे.
संजय त्यातला मोठा मासा घेतो.
विजय : तुझ्या जागी मी असतोना तर मी लहान मासा निवडला असता.
संजय : मला माहीत होत. म्हणुनच तर मी मोठा मासा घेतला.

---------------------------------------------------------

आजीबाई खेड्यातुन शहरात आपल्या नातवाकडे आल्या आहेत.
एक दिवस आजीबाई तक्रार करतात की त्यांचा दात दुखत आहे. म्हणुन नातू त्यांना दातांच्या डॉक्टरकडे घेउन जातो.
डॉक्टर : आजी तोंड उघडा.
आजीबाई थोडस तोंड उघडतात.
डॉक्टर : आजी अजुन तोंड उघडा.
आजीबाई अजुन थोडस उघडतात.
डॉक्टर : आजी अजुन तोंड उघडा.
आजीबाई वैतागुन : कारे मेल्या अजुन किती तोंड उघडू. दात काढायला काय तोंडात जाउन बसणार आहेस काय ?

-------------------------------------------------------------

.......आवडता पक्षी--बदक !!....
बदक मला आवडते!!..बदक पाण्यात असते !!..मी पण पाणी पितो!!आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात!!..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत!!..गांधीजी मोट्ठे नेते होते!!..पण त्यांच्या हातात काठी पण असते!!..काठी पाण्यावर तरंगते..व बदक सुद्धा तरंगते!!..बदक जास्त उड़त नाही..पण पोहते..मी पण swimming ला जाणार आहे!!.बदक वाकड्या पायाने चालते..आमच्या building मधल्या सुलेखाला आम्ही बदक म्हणतो! (सुलेखाताइने मला काठीने मारले!!)..बदक काठीने मारत नाही!!..गांधीजी काठी वापरत;म्हणुन आपला देश लवकर स्वतंत्र झाला...आमच्या घरी कपडे वाळत घालायला काठी वापरतात!!..(आमची आज्जी कुत्र्यांना घबरवायला काठी वापरते!!)..आमच्या घरात चिमण्या व कबुतरे येतात...खिडकीपाशी कावले पण येतात..!!पण बदक येत नाही!!..कारण ते उंच उडू शकत नाही!!..(आम्ही १ st floor ला राहतो)...पण बदक पाण्यात रोज आंघोळ करते!! ..मी पण आंघोळ करतो..कारण आई ओरडत असते!!..पण मी पाच मिनीटात आंघोळ करतो!!बदक रोज आंघोळ करते म्हणुन ते गोरे असते ...(पण काले बदक सुद्धा असते ...ते बहुतेक आंघोळ करत नाही!!)...मला बदक खुप आवडते!!

-----------------------------------------------------------------------

तो : काहो, तुमचे घड्याळ वेळ सांगते कां ?
पुणेकर : नाही हो ! त्यात वेळ बघावी लागते !!!

-----------------------------------------------------------------------------

नवरा : काय गं नऊ वाजले अजुन नाश्ता तयार नाही. जाऊ दे आता मी हॉटेल मधे जाऊन करुन घेईन.
बायको : थांबा पाच मिनीटे.
नवरा : काय पाच मिनीटांत तयार होईल कां नाश्ता तयार ?
बायको : नाही, मी पण तुमच्या सोबत येते तयार होऊन हॉटेलला.

--------------------------------------------------------------------------------

ईंटरव्ह्यु घेणारा उमेदवाराला : काहो, तुम्ही कधी रुजू होणार या प्रश्नाला "ASAP" असे उत्तर दिलेत मी समजू शकतो ASAP म्हणजे as soon as possible पण अपेक्षित पगार येथे तुम्ही AMAP असे लिहीलेत. AMAP असे मी कधि ऎकलेले नाही त्याचा अर्थ सांगाल कां ?
उमेदवार : As much as possible.

----------------------------------------------------------------------------------

बांता : मला काल १० लोकांनी मारलं.
सांता : मग तु काय केलं ?
बांता : मी त्यांना सांगितलं एक - एक करुन या तर बघतो.
सांता : तर काय झालं ?
बांता : तर काय ! मेल्यांनी एकेकांनी मला परत मारलं !!!

------------------------------------------------------------------------------------------

हवालदार दारुड्याला : अरे ए कुठे चाललास असा रात्रीचा ?
दारुडा : मी भाषणाला चाललोय.
हवालदार : भाषणाला ? कुठे ?
दारुडा : दारुचे वाईट परिणाम या विषयावर भाषण ऎकायला.
हवालदार : तुला रात्री बारा वाजता कोण भाषण ऎकवणार ?

-----------------------------------------------------------------
बांता : अरे सांता तु ही गोळी बाजुने कापुन का घेतोस ?
सांता : मी गोळी साईडने कापुन घेतो कारण मला या गोळीचे साईड ईफेक्ट नकोयत.

--------------------------------------------------------------------
लेले पहाटे चार वाजता नेने यांना फोन करुन : अहो नेने, काय हा उच्छाद मांडलाय तुमच्या कुत्र्याने. रात्रभर झोपु दिले नाही मेल्याने. सारखा भुंकतोय रात्रभर.
.
.
.
दुसर्‍या पहाटे चार वाजता नेने : अहो लेले, माझ्याकडे कुत्राच नाही !

------------------------------------------------------------------------------------------
राधिका : बाबा, १५ ऑगस्टला आमच्या शाळेने नारळी पौर्णिमा असल्या मूळे चंद्रावर स्पर्धा ठेवली आहे आणि मी त्यात भाग घेतला आहे क्विझ मध्ये.
छोटा राहूल : बाबा बाबा, तुम्ही जाउ द्याल दिदिला चंद्रावर ?

------------------------------------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment