Welcome To My Blog Friends

Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements

Welcome

Saturday, July 16, 2011

हॅल्लो.... हॅल्लो...



हॅल्लो
..... !!


मुलगी - हॅल्लो.... हॅल्लो...
मम्मी - हां हॅल्लो...
मुलगी - हॅल्लो
, मम्मी मी बोलतेय.
मम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या
?
मुलगी - बसलाय.
मम्मी - कशाने गं
?
मुलगी - आईसक्रिम
मम्मी - मग काही घेतलस की नाही
?
मुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.. म्हटलं काट्यानेच काटा काढावा.
मम्मी - सुपीक आहेस हो
, आज अचानक कसा काय फोन केलास ?
मुलगी - अग
, 'करेन करेन' म्हणत होते. जमलच नाही. तसं आताच कळलय यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन.
मम्मी - खरच की काय
?
मुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे.
मम्मी - बरं
, तू कशी आहेस ?
मुलगी - कशी काय
? तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग गोरा...
मम्मी - अग कशी म्हणजे ... मजेत आहेस ना
?
मुलगी - अगदी मजेत.
मम्मी - आणि जावयबापू काय म्हणताहेत
?
मुलगी - कुठे काय म्हणतोय तो
? घरात असला तर म्हणेल ना ?
मम्मी - देवा
, तुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावयबापू ? मजेत आहेत ना ?
मुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक प्रोब्लेमच झालाय.
मम्मी - काय ग
, काय झालं ?
मुलगी - कसं सांगू
? लाज वाटते बघ सांगायला.
मम्मी - अरे देवा
, अस झालय तरी काय ?
मुलगी - अग त्याला ना...... अ‍ॅसिडीटी झालीय.
मम्मी - अ‍ॅसिडीटी
?
मुलगी - हो ना.... त्याला हा प्रोब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्रोब्लेम होतो म्हणून सांगू
?
मम्मी - तुला कसला ग प्रोब्लेम
?
मुलगी - अगं
, हा कायम पोट धरून आणि मी नाक धरून.
मम्मी - पण अचानक अ‍ॅसिडीटी कशी काय झालीय
?
मुलगी - काही नाही ग. हा सगळा बाहेरख्यालीपणाचा परिणाम
मम्मी - अग
, काय बोलतेस काय तू ?
मुलगी - खरं तेच सांगतेय.
मम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस
?
मुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली
?
मम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो
?
मुलगी - नाईलाज आहे ग माझा. मी तरी काय करू
? मला नाही जमत.. सकाळी सकाळी उठायला... डबा बनवायला..
मम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच
?
मुलगी - अग
, मी जेवणाचा डबा बनवून देत नाही म्हणून तर तो...
मम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं
? एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्‍या बायकांकडे जातो आणि तू...
मुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून.
मम्मी - तू
?
मुलगी - घरगुती जेवण असतं त्या बायकांकडे. पण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही
? रोज रोज ती करी, बिरयाणी कशाला खायची ? असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना अ‍ॅसिडीटी.
मम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.
मुलगी - अग
, असं उठसुठ बाहेर खाल्ल तर मग दुसरं काय होणार ?
मम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस
?
मुलगी - असं काय करतेस
? तुझं मराठी एकदम विक झालय बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.
मम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर
, रोज त्याला दुध देत जा.
मुलगी - चल.... काहीतरीच काय
? दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे ?
मम्मी - अगं
, माझ्या बाये, थंड दुध देत जा. त्याने अ‍ॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना ?
मुलगी - नाही कसा
? हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो.
मम्मी - अरे देवा
, हे आता काय नवीन ?
मुलगी - हो ना. परवा कैर्‍या घेऊन आला
, काल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो ? मला कुठे येतय ते ? आंबटशौकीन कुठचा !
मम्मी - माझ्याकडे पाठव.
मुलगी - त्याला
?
मम्मी - गधडे
, कैर्‍या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन लोणचं बनवून.
मुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला
? आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले की काय ते ?
मम्मी - बाबा
? अग तुझे बाबा जाऊन चार वर्षे झाली ? विसरलीस की काय ? तू मधूराच बोलतेयस ना ?
मुलगी - नाही. मी माधूरी.... अय्या
, राँग नंबर लागला वाटतं. सॉरी हें... मधुराच्या मम्मी...

No comments:

Post a Comment